Homeशहरभिंगार छावणी मंडळ अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत येणार? शासनाने मागविला अभिप्राय

भिंगार छावणी मंडळ अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत येणार? शासनाने मागविला अभिप्राय

advertisement

अहमदनगर दिनांक 28 मार्च
अहमदनगर महानगर पालिकेत आता नवीन भाग जोडला जाणारा असून भिंगार परिसर आता अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणार आहे याबाबत सरकारने तसे आदेश काढले असून त्याबाबतचे अभिप्राय महानगरपालिकेकडून मागविण्यात आले आहेत महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव सुशीला पवार यांच्या आदेशाचे पत्र अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहे अहमदनगर शहरासह पुणे पिंपरी चिंचवड औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी छावणी मंडळाच्या परिसर महानगरपालिकेच्या हाती ला जोडण्यात यावा असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आला आहे पाहुयात नेमकं काय आहेत आदेश


आयुक्त,
पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद व नागपूर महानगरपालिका.
विषय:- Excision of Civil Areas of Cantonments.
संदर्भ:- (१) शासनाची समक्रमांक, दिनांक ०८.०७.२०२२,
१३.०७.२०२२ व २८.०७.२०२२ ची पत्र
(२) संरक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यांचे पत्र क्र.
No. १४६६/US (L-II)/२०२०-D
(Q&C), दिनांक २३.०५.२०२२ व
२७.१२.२०२२.
महोदय,
उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्रान्वये मागविण्यात आलेले आपले अहवाल शासनास
अद्यापही अप्राप्त आहे. केंद्र शासनाच्या संदर्भाधीन दिनांक २३.०५.२०२२ व दि.२७.१२.२०२२ च्या
पत्रास अनुसरुन पुणे कॅटॉनमेंट बोर्ड, खडकी कॅटोनमेंट बोर्ड, देहू कॅन्टोन्मेंट बोर्ड, देवळाली
कॅटॉनमेंट बोर्ड, अहमदनगर कॅटॉनमेंट बोर्ड, औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड व कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड ही
७ कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या महानगरपालिकांच्या क्षेत्रात समाविष्ट करावे किंवा कसे याबाबत आपले
स्पष्ट मत तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सध्याचे क्षेत्र व लोकसंख्या किती व ही कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या
महानगरपालिकेच्या क्षेत्रात समाविष्ट झाल्यास, आपल्या महापालिकेचे सुधारीत क्षेत्र व लोकसंख्या
किती होईल, इ. बाबींच्या सविस्तर तपशिलासह आपले अभिप्राय तात्काळ ई-मेलद्वारे शासनास सादर
करावेत, ही विनंती.
आपली,

(सुशिला पवार)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular