Homeशहरमनपाच्या महिला कर्मचारी खाजगी व्यवसाय करुन नियमाचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप. व्यवसायात...

मनपाच्या महिला कर्मचारी खाजगी व्यवसाय करुन नियमाचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप. व्यवसायात अधिकाऱ्याची देखील भागीदारी. अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चालू असलेला सावळ्या गोंधळाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तारीक कुरेशी.

advertisement

अहमदनगर दि.29 मार्च-(छगन धळकुळे)

अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभाग येथे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम / सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत कंत्राटी कर्मचारी म्हणून महानगरपालिका आयुक्त यांच्याकडील आदेश दि.२५ नोव्हेंबर २०२२ रोजी च्या आदेशान्वये जयश्री जगदीश म्हसे यांना फर्मासिस्ट म्हणून नेमणूक कालावधी ८ ऑक्टोंबर २०२२ ते २९ जून २०२३ देण्यात आलेला आहे. सदर नेमणूक आदेशातील अटी व शर्ती नुसार करारबध्द कालावधी मध्ये कुठल्याही प्रकारचे खाजगी काम / व्यवसाय सक्षम प्राधिकरणाची परवानगी शिवाय काम करता येणार नाही. अशी तरतुद असताना सक्षम प्राधिकरणाची कुठलीही परवानगी न घेता म्हसे यांनी अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभागाचे वैदयकीय आरोग्य अधिकारी  यांच्या नियंत्रणाखाली सदर कर्मचारी कामकाज करीत आहे.

असे असताना मनपाच्या आरोग्य अधिकारी यांच्या  पत्नी बरोबर  भागीदारी करुन महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांच्या मालकीची अशोक बोरगे मेमोरियल हॉस्पीटल हे गट नं १९२ खंडाळा रोड, सोनेवाडी (चास) सोनेवाडी नगर तालुका, अहमदनगर या ठिकाणी सुमन मेडीकोज अँण्ड जनरल स्टोअर्स हे व्यवसाय म्हसे हे स्वतः च्या नावावर व्यवसाय करीत आहे. महाराष्ट्र दुकान व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तों चे विनियमन) नियम, २०१८ अंतर्गत संस्था नोंदणी केलेली असून म्हसे हे अनेक वर्षापासून कंत्राटी तत्वावर सेवा करीत आहे. त्यांना सेवेत खंड करुन वेळोवेळी नेमणुक देण्यात आलेली आहे. जर हे सदरील कर्मचारी मनपा कडे कागदोपत्रे सेवेत असले तरी प्रत्यक्षात सदर हॉस्पीटल चे कामकाज त्यांच्या नियंत्रणाखाली चालु आहे. मला मिळालेली खात्रीशीर माहिती नुसार म्हसे यांची सेवा कायम करण्याच्या हालचाली बोरगे यांच्याकडून होत आहे. म्हसे हे फर्मासिस्ट असले तरी सदर चा खाजगी व्यवसाय सुरु करण्यापासून त्यांच्या नियुक्ती प्रमाणे कामकाज न करता ते बोरगे यांच्या कार्यालयामध्ये सातत्याने वावरत असतात याबाबत मनपा प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी कार्यवाही करण्याचे कोणतेही धाडस दाखवित नसून म्हसे यांना महानगरपालिकेने प्रथम नियुक्ती दिल्यापासून ते आजपर्यंत केलेल्या कामकाजाची सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांना दिलेल्या नेमणुकी नुसार प्रत्यक्षात काम केले आहे का ? तसेच फर्मासिस्ट संबंधीत कर्तव्य हे औषधाशी संबंधीत आहे. परंतु प्रत्यक्षात म्हसे हे आरोग्य विभागाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असतात.

सदर नेमणूक आदेशातील अटी व शर्ती नुसार करारबध्द कालावधी मध्ये कुठल्याही प्रकारचे खाजगी काम / व्यवसाय सक्षम प्राधिकरणाची परवानगी शिवाय काम करता येणार नाही. अशी तरतुद असताना हि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी मला २० जानेवारी २०२३ जा. क्र. १६२९ नेमणूकी मार्गदर्शक सूचना मध्ये सदर कर्मचाऱ्यांनी खासगी व्यवसाय करावा किंवा नाही या बाबत तरतूद नाही अशी खोटी माहिती दिली. या सर्व प्रकरणा बरोबर म्हसे यांनी बोरगे यांच्याबरोबर वरीष्ठांची कोणतंही पूर्व परवानगी न घेता खाजगी व्यवसाय सुरु केल्याबददल त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तारीक कुरेशी यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे केली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चाललेला सावळा गोंधळ बाहेर काढण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular