अहमदनगर दि.६ ऑक्टोबर
भिंगार परिसरातील अवैध धंदे पुन्हा चर्चेत आले असून या अवैध धंदा चालकांनी शुभम बाबासाहेब काळे यांना शिवीगाळ करुन व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचा प्रकार घडला असून या बाबत शुभम काळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देऊन अवैध धंदा चालकांविरोधत कडक कारवाई करावी अशी मागणी केलीय.
शुभम बाबासाहेब काळे यांचा विट व्यवसाय व बिल्डींग मटेरीअल सप्लायर्सचा व्यवसाय असून भिंगार मधील छावणी मंडळाच्या मालकीचे दुकान भडे तत्वावर घेण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी गेले असताना
शेजारील दुकानातील राजु दहिहांडे आणि शिवाजी दहिहांडे इतर काही लोकांनी मला विचारले की या ठिकाणीं कोणता व्यवसाय चालू करणार आहे त्यावर काळे यांनी बिल्डिंग चालू करण्याचे सांगितले असतात
राजु दहिहांडे याने काळे यांना सांगितले की येथे बिंगो जुगार, मटका,अवैध दारु विक्री या सर्व व्यवसाय चालु असल्याने माझ्या ग्राहकांना पार्किंगसाठी जागा मिळणार नाही. त्यामुळे तु येथे व्यवसाय करु नकोस असे बोलवून शिवी गाळ करत अंगावर धावून आला व
परत येथे आल्यास जिवंत सोडणार नाही असे बोलवून धक्का-बुक्की करत हाकलवून दिले. अशी लेखी तक्रार शुभम काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली असून अवैध धंदे चालकांविरोधात खडक कारवाई करावी अशी मागणी ही केली आहे. तसेच या इसमांवर या आधीही गंभीर गुन्हे दाखल असून यांच्यामुळे माझ्या जनता धोका निर्माण होऊ शकतो असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री ,गृहमंत्री आणि पोलीस महानिरिक्षक नाशिक परीक्षेत्र यांना पाठविण्यात आल्या आहेत