Home क्राईम मुकुंदनगर परिसरात गोमांस ची विक्री करणा-या तीन आरोपींवर भिंगार कॅम्प पोलीसांनी केली...

मुकुंदनगर परिसरात गोमांस ची विक्री करणा-या तीन आरोपींवर भिंगार कॅम्प पोलीसांनी केली कारवाई

अहमदनगर दि.२ नोव्हेंबर

अहमदनगर शहरा लगत असणाऱ्या भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुकुंद नगर परिसरात गोवंशी जातीचे जनावरांची कत्तल करून मानस विक्री होत असल्याची माहिती भिंगार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुकुंद नगर भागातील इनाम मशिदी जवळ असणाऱ्या हिना पार्क येथील पत्राच्या शेडमध्ये छापा टाकला त्या ठिकाणी 60,300 /- रू किं चे अंदाजे 335 किलो गोमांस मिळून आले तसेच वजन काटे, वजन मापे,गोमांस कापण्यासाठी लागणारे साहीत्य असा एकून 70,300 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रमीज राजमोहम्मद शेख (वय 22 वर्षे रा.वाबळे कॉलनी, मुकुंदनगर ता.जि. अहमदनगर ) वसीम मोहम्मद कुरेशी( वय 26 वर्षे रा.घर नं 37,सदर बाजार, भिंगार ता.जि. अहमदनगर) जाकीर गुलामनबी कुरेशी (वय 38 वर्ष रा. हमालवाडा, नालबंद खुंट ता.जि. अहमदनगर) यांच्या विरूद्ध पोना, गणेश साठे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शना खाली सपोनी शिशिरकुमार देशमुख,भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोहेकाँ, विलास गारूडकर, पोहेकाँ दिलीप झरेकर, पोहेकाँ,अजय नगरे, पोना, आर आर द्वारके, पोना,गणेश साठे, पोना,राहुल गोरे, पोना, भानूदास गौतम खेडकर, पोना, सचिन धोंडे, चापोकाँ भागचंद लगड, चापोकाँ संजय काळे यांनी केली आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version