Homeराजकारणराक्षस रुपी भिंगार छावणी मंडळातून आम्हाला राम लक्ष्मणासारखे काम करून महपालिका हद्दीत...

राक्षस रुपी भिंगार छावणी मंडळातून आम्हाला राम लक्ष्मणासारखे काम करून महपालिका हद्दीत घ्या.. भिंगार मध्ये विकासाचे पर्व फक्त खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगतापच करू शकतात…आधुनिक काळातील विकासपुरुष राम लक्ष्मण जोडीमुळे भिंगार शहर आणि नगरचा लवकरच काय पालट होईल जनतेला विश्वास…

advertisement

अहमदनगर दि.३ डिसेंबर
अहमदनगर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते दिसू लागले आहेत नगर शहरांची दिल्या अनेक वर्षांपासून ची खड्डे नगर म्हणून ही ओळख आता पुसण्यास सुरुवात झाली असून कायमस्वरूपी तोडगा म्हणून सिमेंट काँक्रीटचे रस्ते सध्या ठीक ठिकाणी झाले असेल आणि काय ठिकाणी रस्त्यांचे कामे सुरू आहेत अहमदनगर शहराचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या निधीच्या माध्यमातून हे विकास कामे सुरू आहेत.
मागील काही काळात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गट हा भाजपच्या साथीने पुन्हा सत्तेत आला त्यामुळे अहमदनगर शहराला चांगलीच विकासाची गती मिळाली असून ठिकठिकाणी शहर सौंदर्यकरणाबरोबरच विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. राज्यामध्ये भाजपा, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गट एकत्र सत्तेत आल्यामुळे विकास पर्वाला सुरुवात झाली असून त्या जोडीला दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील यांची साथ मिळाल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू झाली आहेत.

आज अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज भिंगार छावणी मंडळाची हद्द महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याबाबतच्या प्रश्नावर खासदार सुजय विखे पाटील यांनी बैठक आयोजित केली होती यावेळी अनेक भिंगारवास यांनी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवत दोघांचीही कौतुक केले आम्हाला भिंगारच्या रावण रुपी छळ छावणीतून बाहेर काढून विकासाकडे नेण्यासाठी दोघांनीही राम लक्ष्मणाची भूमिका बजवावी त्यामुळेच नगर शहराचा आणि भिंगारचा विकास होईल अशी अपेक्षा यावेळी भिंगार मधील नागरिकांनी बोलताना व्यक्त केली. भिंगार शहराचा लवकरच अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी ग्वाही खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यास अनुमोदन दिल्यानंतर भिंगार मधील नागरिकांच्या वतीने खासदार संजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला या वेळी विकास पुरुष राम लक्ष्मण खा. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाच्या घोषणाही देण्यात आल्या.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular