Homeशहरभिंगार शहराचा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा येत्या चार महिन्यात भिंगार शहर...

भिंगार शहराचा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा येत्या चार महिन्यात भिंगार शहर महानगरपालिकेत हद्दीत समाविष्ट होणार खासदार सुजय विखे पाटील

advertisement

अहमदनगर दि.३ डिसेंबर
अहमदनगर मधील भिंगार छावणी मंडळ अहमदनगर महानगर पालिकेत समाविष्ट करून घ्यावी का नाही या बाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली या बैठकीला आमदार संग्राम जगताप,छावणी मंडळाचे मुख्याधिकारी, महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे प्रा.माणिकराव विधाते,नगरसेवक. मिलिंद गंधे ,अनिल शिंदे,निखिल वारे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, तसेच भिंगार छावणी मंडळातील माजी सदस्यांसह भिंगार मधील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग या बैठकीला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

या बैठकीत खासदार सुजय विखे पाटील यांनी भिंगार छावणी मंडळ अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येण्याबाबत सर्वांची मते जाणून घेतली भिंगार मधून आलेल्या नागरिकांनी आम्हाला या छळ छावणीतून मुक्त करा अशी एकमुखी मागणी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे केली. भिंगार छावणी मंडळाच्या कारभाराला भिंगार मधील नागरिक कंटाळली असून भिंगार छावणी मंडळाच्या कारभारामुळे अनेक नागरिक भिंगार शहर सोडून निघून गेले आहेत. भिंगार छावणी मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि भिंगार छावणी मंडळाच्या प्रशासकीय कामकाजावर सर्वच भिंगार मधील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत कठोर शब्दात टीका केली. भिंगार छावणी मंडळातून आम्हाला कायमस्वरूपी वगळून नगरपालिकेत अथवा महानगरपालिकेत वर्ग करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तर अहमदनगर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर हद्दवाढी मध्ये जी गावे महानगरपालिकेच्या हद्दीत घेण्यात आली त्यासाठी सरकारकडून कोणताही निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे अनेक उपनगरांमध्ये आणि हद्दवाढ झाल्यानंतर महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अद्यापही विकास झालेला नाही त्यामुळे भिंगारवासीयांना घेण्याआधी विकासाबाबत तरतूद करण्याची मागणी यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केली. भिंगारवासियांना घेण्याआधी अहमदनगर शहरातील परिस्थिती पाहूनच मग त्यांना सामाविष्ट करावे अन्यथा भिंगार व्यवसायांची परिस्थिती आगीतून उठून फुपाट्यात पडण्यासारखी नको असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

भिंगार छावणी मंडळाचा प्रश्न येत्या चार महिन्यात निकाली निघेल असे आश्वासन खासदार सुजय विखे पाटील यांनी या वेळी बोलताना दिले. येत्या हिवाळी अधिवेशना मध्ये हा प्रश्न उपस्थित केला जाईल आणि त्यानंतरच्या काळात प्रशासकीय कारवाई पूर्ण झाल्यानंतर भिंगार छावणी मंडळ बरखास्त होऊन भिंगारवासियांना अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत घेण्यास काहीच अडचण राहणार नाही अशी ग्वाही खासदार सुजय विखे पाटील यांनी भिंगारवासींना दिली आहे.

तर अहमदनगर महानगरपालिकेची परिस्थिती चांगली नाही मात्र तरीही छोटा भाऊ म्हणून भिंगार शहराला आम्ही महानगरपालिकेच्या हद्दीत घेण्यास तयार असून प्रशासकीय स्तरावर जी मदत लागेल ते आम्ही देण्यात तयार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी सांगितले खासदार आणि आमदार निधीतून भिंगार शहराचा विकास होईल आणि अनेक वर्षांपासूनचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी दोघेही प्रयत्नशील राहू असेही यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

या बैठकीनंतर खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार भिंगार शहरातील नागरिकांतर्फे करण्यात आला तर पेढे वाटून आणि फटाके फोडून भिंगार छावणी मंडळातून मुक्त होऊन अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत येणार असल्याचा आनंदउत्सव भिंगारच्या नागरिकांनी आमदार आणि खासदारांबरोबर साजरा केला.

advertisement

Previous article
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular