Homeशहरबिबट्याची पुन्हा नगर शहराच्या वेशीवर दस्तक... बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दांपत्य बालमबाल बचावले....

बिबट्याची पुन्हा नगर शहराच्या वेशीवर दस्तक… बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दांपत्य बालमबाल बचावले….

advertisement

अहमदनगर दिनांक २४ जून
अहमदनगर शहराच्या उपनगर भागात असलेल्या केडगाव येथे बिबट्याने काही महिन्यांपूर्वी चांगलाच उच्छाद मांडला होता केडगाव गावठाण मध्ये बिबट्या घुसल्यामुळे काही नागरिकांवर बिबट्याने हल्ला केला होता. अखेर काही तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाने बिबट्याला पकडण्यात यश मिळवल होतं. मात्र बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि भक्षांच्या शोधात तसेच पाण्याच्या शोधात बिबट्या शहराकडे आपली पावले वळवत आहे. शहराचा आजूबाजूला असलेल्या उसांच्या शेतामुळे लपण्यासाठी बिबट्यांना चांगली जागा मिळते तसेच कुत्र आणि शेतकऱ्यांचे जानवारे हे खाद्य भेटत असल्यामुळे बिबट्या साध्या शहराच्या आजूबाजूला चांगलाच नजरेस पडू लागला आहे.

अहमदनगर शहराच्या तपोवन रोडवरील ढवण वस्ती पलीकडे असलेल्या कराळे वस्तीवर बिबट्याचं दर्शन अलीकडच्या काळात वारंवार होत असून दोन दिवसांपूर्वी त्याने एका गायीच्या वासराला आपले भक्ष केले होते. तर आज कराळे नामक एका शेतकरी दांपत्यावर उसतून आलेल्या बिबट्याने हल्ला केला मात्र सुदैवाने कराळे दांपत्य गाडीवर असल्यामुळे हे दाम्पत्य वाचले.

या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी आता या परिसरातील शेतकरी करू लागले आहे. सध्या पेरणीचा काळ असल्यामुळे शेतकरी सतत शेतीवर जात असतो रात्री अपरात्री शेतीचे कामे करत असताना बिबट्याने हल्ला केला तर मोठा अनर्थ घडू शकतो त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर या परिसरात येऊन पाहणी करून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी या परिसरातील शेतकरी करू लागले आहेत.

ढवन वस्ती आणि कराळे वस्ती ही अहमदनगर शहराच्या अत्यंत जवळ असून जर बिबट्या भाक्षाच्या शोधात पुन्हा एकदा शहरात आला तर बिबट्यामुळे अनेक गंभीर घटना घडू शकतात. घाबरलेला बिबट्या कोणावरही हल्ला करू शकतो त्यामुळे बिबट्याने शहराच्या वेशीवर दस्तक दिली आहे तो शहरात घुसण्याआधीच त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता समोर येऊ लागले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular