अहमदनगर दि.२४ जून
नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी अशोक कटारिया,अनिल कोठारी,राजेंद्र लुणिया ,प्रदिप पाटील
सी ए शंकर अंदानी हे न्यायालयीन कोठडीत असून. या प्रकारचा तपास मध्यंतरी डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे असताना त्यांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली होती मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची पुन्हा नाशिक येथे बदली झाल्यानंतर तपास संत गतीने होईल का काय अशी भीती ठेवीदारांना वाटत असतानाच आता हा तपास अहमदनगर शहराचे डीवायएसपी अमोल भारती यांच्याकडे आला होतं त्यांनी या प्रकारात आता अविनाश प्रभाकर वैकर या आरोपीस अटक केली होती तोही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
अर्बन बँकेच्या 291 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत बँकेतील अधिकारी आणि संचालक अटक झाले होते मात्र आता या घोटाळ्यात कर्जदारही अटकेत आहेत. तर काही कर्जदारांचे माहिती पोलिसांना भेटली असून लवकरच त्यांनाही अटक करण्याची कारवाई सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे त्यामुळे आता ज्या कर्जदारांनी खोटे कागदपत्र देऊन कर्ज घेतले आहेत अशा कर्जदारांवर आर्थिक गुन्हे शाखेची नजर असणार आहे. या प्रकरणात एकूण १०५ आरोपी असून बरच आरोपी अटकेच्या भीतीने फरार झालेली आहेत.
नगर शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरला आर्थिक गुन्हे शाखेने कर्ज घोटाळा प्रकरणी ताब्यात घेतले असून या डॉक्टरला आधीच शहर सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी अटक झाली होती यादीही आर्थिक पासूनचे तीन ते चार वेगवेगळे गुन्हे डॉक्टरवर दाखल असून नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणातही डॉक्टरला आता अटक होण्याची शक्यता आहे अनेक संशयास्पद व्यवहार डॉक्टरच्या कर्ज खात्यावरून झाले असून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेने डॉक्टरला ताब्यात घेतल्यानंतर अनेकांची गाळण उडाली आहे.