Homeराजकारणनगर शहर विधानसभेसाठी भाजपकडून ज्येष्ठ नेते किशोर डागवाले यांना उमेदवारी द्यावी

नगर शहर विधानसभेसाठी भाजपकडून ज्येष्ठ नेते किशोर डागवाले यांना उमेदवारी द्यावी

advertisement

अहमदनगर दिनांक 25 जून

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. नगर शहर विधासभेसाठी भारतीय जनता पार्टी कडून भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते किशोर डागवाले हे उमेदवारीसाठी रिंगणात उतरावे अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. नुकतेच काही समर्थकांनी त्यांची भेट घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी गळ घातली आहे.


राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाले असल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी शिवसेना (ऊबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळी कडून कंबर कसली आहे. अहमदनगर दक्षिण मध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव करत निलेश लंके खासदार झालेले आहेत.
नगर शहरात मात्र सुजय विखे पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले होते त्यामुळे भाजप पक्षाच्या वतीने जर उमेदवार उतरला तर निश्चितच तो विजयी होऊ शकतो असा विश्वास भाजपच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना असून किशोर डागवाले यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आणि संपूर्ण नगर शहराला माहित असलेला चेहरा असून त्यांनी केलेल्या अनेक सामाजिक आणि राजकीय कामातून आपल्या कामाचा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे त्यामुळे त्यांनी या विधानसभेच्या मैदानात उतरावे अशी मागणी किशोर डागवाले यांचे समर्थक करू लागले आहेत.

लोकसभेला महायुतीच्या माध्यमातून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भरघोस मदत केली असून विधासभेला नगर शहराची जागा भाजपला द्यावी अशी मागणी किशोर डागवाले यांच्या समर्थकांनी केली आहे.

किशोर डागवाले यांनी यांनी कोरोना काळात हजारो रुग्णांना मदत केली आहे. मोफत आरोग्य सेवा, सर्वरोग निदान शिबिराच्या माध्यमातून, सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ते सतत नागरिकांच्या संपर्कात असतात तसेच पक्षावर ठेवलेली निष्ठा आणि कार्यकर्त्यांना दिलेली ताकद या सर्व गोष्टींचा विचार भाजपचे वरिष्ठ नेते करतील असा विश्वास आहे किशोर डागवाले यांच्या समर्थकांना आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular