Home क्राईम मुलाला बॅटने मारहाण करणाऱ्या व्हायरल व्हिडिओची सत्यता अली समोर मुलाला मारहाण करणारा...

मुलाला बॅटने मारहाण करणाऱ्या व्हायरल व्हिडिओची सत्यता अली समोर मुलाला मारहाण करणारा तो शिक्षक फरार

बिहार दि ६ जुलै

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका लहान मुलाला एक जण बॅट ने मारत असलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे नेमकं हे प्रकरण काय आहे या बाबत तर्क वितर्क लावले जात होते मात्र आता या व्हिडिओ ची सत्यता समोर आली असून बिहारच्या पाटणामधील धनरुआ इथं ही भयंकर घटनी घडली होती.

कोचिंग क्लासमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षकानं अमानुष  मारहाण केली. ही मारहाण इतकी संतापजनक होती, की या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गावातल्या लोकांनी कोचिंग क्लासमधील शिक्षकालाच नंतर बदडून काढला. कोचिंग क्लासमध्ये एका वर्गात हा शिक्षक इतर मुलांच्या देखत एका पाच वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता .

ही धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली. बिहारच्या पाटणामधील धनरुआ इथं ही भयंकर घटनी घडली होती. जया क्लासेसमध्ये शालेय विद्यार्थ्यांची आणि सैनिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणी दिली जाते. शनिवारी छोटू नावाच्या एका शिक्षकाला एका शुल्लक कारणावरुन राग आला. विद्यार्थ्यावर आलेला राग या शिक्षकानं इतक्या भयंकर पद्धतीनं व्यक्त केला, की वर्गातील सगळेच विद्यार्थी हादरुन गेले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version