Home Uncategorized वाहन खरेदी विक्री करता करता तो झाला सराईत दुचाकी चोर एक दोन...

वाहन खरेदी विक्री करता करता तो झाला सराईत दुचाकी चोर एक दोन नव्हे तर तब्बल 23 दुचाकी त्याने एकट्याने चोरल्या तोफखाना पोलिसांची मोठी कारवाई

अहमदनगर दि.४ जून

शहर, उपनगरातून दुचाकी चोरून त्या बीड जिल्ह्यात विक्री करणार्‍या आरोपीला अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. किसन ऊर्फ कृष्णा पोपट सापते (वय 26 रा. खकाळवाडी, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे लाख रूपये किंमतीच्या 23 दुचाकीं पोलिसांनी हस्तगत केल्या असून आणखी चोरीच्या दुचाकी मिळण्याची शक्यता आहे.


दरम्यान किसन सापते हा वाहन-खरेदी विक्रीचा व्यावसाय करत होता. त्याची बीड जिल्ह्यात ओळख होती. या ओळखीतून चोरीच्या दुचाकी त्याने 70 ते 80 हजार रूपये किंमतीला जवळचे नातेवाईक, मित्र-परिवार यांना विक्री केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आता पोलिसांनी सर्व दुचाकी जप्त केल्याने चोरीच्या दुचाकी घेणार्‍यांचीही फसवणूक झाली आहे. 28 एप्रिल, 2022 रोजी दुपारी किसन सापते याने प्रोफेसर कॉलनी चौकातून सुनील भानुदास सरोदे यांची बुलेट दुचाकी चोरली होती. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती सापते याला समजल्याने त्याने सरोदे यांची दुचाकी भिंगारमध्ये सोडून तो पसार झाला होता. दरम्यान तोफखाना पोलीस त्याच्या मागावर होते.


जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्य मार्गदर्शनाखालीतोफखाना तपास पथकामधील पोउपनिरी, समाधान सोळंके, पोहेकॉ / दत्तात्रय जपे, पोहेकॉ सुनिल शिरसाठ, पोना अविनाश वाकचौरे, पोना वसिम पठाण, पोना अहमद इनामदार, पोना शैलेश गोमसाळे, पोकॉ सतिष त्रिभुवन, पोकॉ शिरष तरटे, पोकॉ सचिन जगताप,पोकॉ धिरज खंडागळे पोकॉ चेतन मोहिते, पोकॉ गौतम सातपुते, पोकॉ अतुल कोतकर, पोकॉ प्रशांत राठोड यांनी केली आहे.

तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय जपे यांचा दांडगा अनुभव या गुन्ह्याचा तपास कामी उपयोगी पडला तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड यांनी वेळोवेळी आरोपीच्या मोबाईल चे लोकेशन दिल्यामुळे आणि सर्व पोलीस टीमने एकत्रितपणे मेहनत घेतल्यामुळे एवढ्या मोठ्या चोरीच्या गाड्यांचा उलगडा करण्यास तोफखाना पोलिसांना यश आले आहे

अवघ्या 500 रुपयात बुलेट

या गुन्ह्यातील आरोपी ने एक बुलेट फक्त पाचशे रुपयाला विकली असल्याचं समोर आले आहे .एका बुलेट चा मालक दाढी करण्यासाठी सलूनच्या दुकानात बसला असताना या चोरट्यांनी त्याची गाडी चोरण्याचा प्रयत्न केला मात्र ही गोष्ट बुलेट मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने या चोरट्याला सलून च्या दुकानातूनच जोरदार शिवी हासडली होती याचा राग मनात ठेवून गाडी चोरट्याने ती गाडी चोरून अवघ्या 500 रुपयांना विकली होती कारण त्याच्या डोक्यात शिव्या दिल्याचा राग असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version