Home क्राईम उपअधीक्षक पथकाचा पाइपलाईन रोडवरील यशोदानगर जवळ छापा… बिंगो चालकांवर कारवाई…

उपअधीक्षक पथकाचा पाइपलाईन रोडवरील यशोदानगर जवळ छापा… बिंगो चालकांवर कारवाई…

अहिल्यानगर दिनांक १९ मे

तोफखाना पोलीस स्टेशन हददीतील पाईपलाईन रोड येथील यशोदा नगर बाजार तळावर बिंगो जुगार सुरू असून हा बिंगो जुगार राहुल इंगळे नामक इसम चालवत आहे अशी माहिती नगर शहराचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकाला त्या ठिकाणी छापा टाकण्याचा आदेश दिला त्यानुसार पोसई दत्तात्रय दगडू शिंदे, पोलिस नाईक हेमंत बाजी खंडागळे, पोलीस कॉन्स्टेबल सागर राजेंद्र द्वारके, पोहेको महेश दौलत मगर यांच्या पथकाने यशोदा नगर येथील बाजार तळावर जाऊन छापा टाकला असता एका पत्र्याच्या शेडमध्ये राहुल इंगळे हा लोकांना प्रेरित करून एलसीडी स्क्रिनवर असलेल्या नंबरवर पैसे लावुन बिगो नावाचा हार-जितीचा जुगार खेळवत होता. त्या ठिकाणी बिंगो नावाचा जुगार सुरू असल्याची खात्री पट्टा पोलिसांनी त्या ठिकाणी बिंगो जुगार चालवत असलेल्या राहुल नंदु इंगळे वय ३४ रा. पाईपलाईन रोड, पदमानगर, अहिल्यानगर (बिगो मालक) २) किरण एकनाथ शिदोरे वय ३४ रा. पाईपलाईन रोड, पदमानगर, अहिल्यानगर (बिंगो खेळणारा) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी या छाप्यात बिंगो नावाच्या जुगाराची साधने व रोख रक्कम, एलसीडी, सिपीओ, माऊस, किबोर्ड, रिमोट व ०१ ते १० आकडे असलेला रेक्झिनचे कापड रोख रक्कम असा 28 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोन्ही आरोपींना तोफखाना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध तोफखान पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version