अहिल्यानगर दिनांक 13 जानेवारी
अहिल्यानगर मधील सुयोग पार्क आदर्श नगर परिसरात झालेल्या हाणामारीत एका तरुणावर चाकूने वार झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये सध्या निवडणुक चांगलीच चुरशीची झालीं असून या भागातील भाजप युतीचे उमेदवार दत्ता गडाळकर यांच्या कुटुंबावर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नातेवाईकांनी जीवघेणा हल्ला केल्याने यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या छातीवर चाकूने वार करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार दत्ता गाडळकर यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नातेवाईकांनी निवडणुकीच्या कारणातून हा हल्ला केला असून या हल्ल्यात सिद्धांत देवकर, आर्यन एकाडे, स्वाती विजय गाडळकर यांना जबर मारहाण करण्यात आली असून चाकूने वार झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे.