HomeUncategorizedभाजपाच्या पदाधिकाऱ्याने दिली आपल्याच पक्षातील कार्यकर्त्याला धमकी नगर शहरातील प्रकार

भाजपाच्या पदाधिकाऱ्याने दिली आपल्याच पक्षातील कार्यकर्त्याला धमकी नगर शहरातील प्रकार

advertisement

अहमदनगर दि.११ मे
भारतीय जनता पार्टी मधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने आपल्याच पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला धमकी देण्याचा प्रकार समोर आला असून याबाबत त्या सामान्य कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

प्रियेश वाघमारे,विक्रम काळे,योगेश डोंगरे आणि
विनोद घाटविसावे यांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाअधिकाऱ्यांना देण्यात आले असून.या निवेदनामध्ये मी भा.ज.पा. या पक्षाचा नगर जिल्ह्यातील कार्यकर्ता असून मला शहरातील एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने पक्षातील पदाचा दुरुपयोग करून बाकीचे कार्यकत्यांना आणि मला आपल्या पक्षाचे नावाखाली वारंवार फोनद्वारे, तसेच व्हॉटसॲप द्वारे कॉल करून धमकी, शिवीगाळ, व कोणतेही काम करू नये म्हणून धमकी देत आहे. तसेच कुणाकडे तक्रार केली किंवा मदत मागीतली तर मला बंदूक दाखवून जिवे मारण्याची
धमकी देत आहे असे नमूद केले आहे.यामुळे सर्व सामान्य कार्यकर्त्याला काम करताना भीती वाटते त्यामुळे योग्य न्याय मिळाला अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रति भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचवण्यात आले असल्याची माहिती मिळतेय.

 


advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular