Home राजकारण धृतराष्ट्र…महायुती मधून शिवसेना का बाहेर पडली…

धृतराष्ट्र…महायुती मधून शिवसेना का बाहेर पडली…

Oplus_0

अहिल्यानगर
अहिल्यानगर महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.मात्र अधिकृत पक्षाचे तिकीट कोणाला मिळते याची उत्कंठा शेवट पर्यंत राहिली यात भाजप कडून अनेक इच्छुक उमेदवार असल्याने भाजप पक्षाचे तिकीट कोणाला मिळेल याची उत्कंठा शेवटपर्यंत होती अखेर शेवटच्या दिवशी अनेक विद्यमान आणि निष्ठावंत उमेदवारांना डीच्चू देत भारतीय जनता पार्टीने इतर पक्षातील उमेदवार भाजपमध्ये काही तासापूर्वी आले असताना त्यांना उमेदवारी दिली. तर काही ठिकाणी इतर प्रभागातील उमेदवार दुसऱ्या प्रभागात पाठवून त्यांनाही उमेदवारी दिल्याने अनेक ठिकाणी नाराजी पसरली आहे.

Oplus_131072

मुख्यता महायुती मधून शिवसेना बाहेर पडली याचा सर्वदोष भारतीय जनता पार्टीचे काही इच्छुक नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपलाच देत असून पुत्र प्रेमापोटी ही युती तुटल्याचं खाजगी मध्ये चर्चा सुरू आहे. भाजपचे शहर अध्यक्ष यांच्या मुलाला उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी युती पणाला लावली अशी चर्चा आता खाजगी मध्ये सुरू असून याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी आणि नाराज नगरसेवकांनी आमच्याशी बोलताना सांगितला आहे.

तर राष्ट्रवादीच्या दबावापोटी भाजपने आपले उमेदवार बदलले असल्याने त्या ठिकाणी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी नाराजीचा सूर उमटला असून याबाबत पक्षाच्या मीटिंगमध्ये चांगलीच गरमागरम चर्चा होईल आणि त्यावेळेस जाब विचारला जाईल असेही भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version