HomeUncategorizedकार्यकर्त्यांना नेहमीच टोचून बोलणाऱ्या "त्या" नेत्याचा शिवराळ भाषेत घेतला समाचार...

कार्यकर्त्यांना नेहमीच टोचून बोलणाऱ्या “त्या” नेत्याचा शिवराळ भाषेत घेतला समाचार…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 23 एप्रिल

राज्यात आणि देशात सत्तेत असणाऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या वतीने आज कश्मीर मधील पहलगाम इथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आज नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात घेण्यात आला होता. मात्र कार्यक्रमा आधीच राष्ट्रीय पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला पक्षातील एका दुसऱ्या पदाधिकाऱ्याने चांगलेच सुनावले. मात्र इतर पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे हा वाद तिथेच थांबला असला तरी जो पदाधिकारी नेहमीच इतर कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना टोचून बोलणे अथवा अपमान करण्याचे काम नेहमीच करत असतो. त्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला आज चांगलेच शिवराळ भाषेत सुनावण्यात आले.

या पदाधिकाऱ्याची मध्यंतरी पक्षातून हकलपट्टी झाली होती. आता पुन्हा तो पक्षात आला आहे. एकदा तर थेट त्याने राज ठाकरे यांच्या पक्षाचे तिकीट जाहीर झाल्यानंतर शेवटच्या दिवशी गायब होण्याचा पराक्रमही केलेला आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेतही निवडणूक लढवणार म्हणून शेवटपर्यंत गाजराची पुंगी वाजवून शेवटी आपलेच हसे करून घेतले होते.

पक्षाचा वरिष्ठांनी या वादावर तात्पुरता पडदा टाकला असला तरी हा वाद इथेच थांबणारा नसून अन्याय झालेल्या त्या पदाधिकाऱ्याने ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला चांगलाच धडा शिकवण्याचा विडा उचलला असून लवकरच हा वाद पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचणार आहे हे निश्चित. सध्या त्या राष्ट्रीय पक्षात अंतर्गत निवडणुका सुरू असून त्या निवडणुकीचेही काही पडसादही आता उमटू लागले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular