अहमदनगर दि.४ डिसेंबर
भाजपच्या वाचाळ वीरांना आता आवरा असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण भाजपचे राज्यपाल ,प्रवक्ते,आमदार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वेगवेगळे वक्तव्य करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वारंवार समोर येत आहे. सुरुवात झाली ती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्यापासून त्यानंतर भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी आणि आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी पुन्हा नवीन जावई शोध लावला असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी येथे नाही तर कोकणात झाल्याचं त्यांनी सांगितले आहे. आणि त्यांचे बालपण रायगडावर गेल असल्याचं त्यांनी भर पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी काही पत्रकारांनी त्यांना शिवनेरी म्हणा असं सांगितल्यानंतरही प्रसाद लाड यांच्यासमोर असलेल्या कागदावर लिहल्याप्रमाणे ते वाचतच राहिले त्यामुळे त्यांचा अज्ञान पुन्हा एकदा उघडे पडले असून हा वादाचा मुद्दा होऊ शकतो.
कारण सध्या भगतसिंग कोशियारी हटाव ही मोहीम जोरात सुरू असून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही शनिवारी याबाबत आपली रोखठोक भूमिका समोर आली असल्या लोकांना टकमक टोकावरून ढकलून देण्याची गरज असल्याचं सांगितले होते त्यामुळे आता पुन्हा भाजपकडून असे वक्तव्य झाल्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे भाजपकडून असे वक्तव्य मुद्दामुन केले जात आहेत का? की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान होत आहे. याबाबत आता भाजपच्या वरिष्ठांनी कडक भूमिका घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुणीही वक्तव्यच करू नये असा आदेश काढण्याची गरज असल्याचं दिसून येतंय.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— NCP (@NCPspeaks) December 4, 2022