मुंबई दि.२८ जून
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात घडामोडींना आता वेग अला असून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लागला होता. मात्र भाजपने पहिले दोन-तीन दिवस कोणतीच भूमिका जाहीर न केल्याने नेमकं या बंडाचे मागे कोण आहे हे समजू शकत नव्हतं मात्र आता भारतीय जनता पक्ष ऍक्शन मोडमध्ये आली असून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची भेट घेतली आणि विधानसभेत बहुमत चाचणी बोलवण्याची मागणी केली होती.
त्यानुसार आता राज्यपालांनी 30 जूनला सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशन बोलवले असून या दिवशी सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. या बहुमत चाचणी मध्ये सरकार बहुमत सिद्ध करू शकले तर ठाकरे सरकार वाचू शकते. मात्र जर बहुमत सिद्ध करू शकले नाही तर महाराष्ट्राला जुलै महिन्यात नवीन सरकार मिळू शकते अशी शक्यता आहे.
आता शिवसेनेची सर्व मदार ही बंडखोरी करून गेलेले एकनाथ शिंदे यांच्यावर असून गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेकडून बंडखोर आमदारांबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असल्यामुळे हे आमदार पुन्हा शिवसेनेकडे येतील याची शक्यता नाही. मात्र हे आमदार महाराष्ट्रात आल्यावर काय भूमिका घेतील आणि शिवसेना काय भूमिका घेणार याबाबत मात्र मोठी उत्सुकता लागलेली आहे.