अहमदनगर दि।१७ डिसेंबर
गुरुवारी रात्री तोफखाना पोलीस स्टेशनच्या समोर युवा मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बंटी डापसे,बजरंग दलाचे शहराध्यक्ष कुणाल भंडारी यांनी धक्काबुक्की करून धमकी दिल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये सर्फराज सय्यद यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता मात्र अशी कोणती घटना घडलीच नसून तोफखाना पोलीस स्टेशनच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये सर्व प्रकार चित्रित झाला असून बंटी डापसे आणि कुणाल भंडारी यांच्यासह ज्या दोन तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते खोटे असून या गुन्ह्यात ज्यांची नावे घेतले आहेत त्यापैकी दोन तरुण त्या ठिकाणी उपस्थित नव्हते हे सीसीटीव्ही मध्ये दिसत असताना खोटे गुन्हे नोंदवून शहरातील शांतता बबिघडवण्याचे काम सर्फराज सय्यद करत असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद,भाजपा, बाळासाहेबांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला असून याबाबत या सर्व पक्ष आणि संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन सत्य परिस्थिती समोर आणली आहे.
15 डिसेंबर म्हणजेच गुरुवारी काही महिला विविध कंपन्यांचे प्रॉडक्ट विकत असताना घरोघरी जाऊन घराचे फोटो काढत फोन नंबर जमा करत असल्याची माहिती या कार्यकर्त्यांना मिळाली होती त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन शहानिशा करून तोफखाना पोलिसांना या घटनेबाबत कळवले होते पोलिसांनी ताबडतोब चितळे रोड येथून काही महिलांना ताब्यात घेतले होते व पोलीस स्टेशनला आणले होते.या प्रकरणानंतर पोलिसांनी बंटी डापसे आणि कुणाल भंडारी यांना या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवले होते. डापसे आणि भंडारी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सदर महिलांच्या बाजुने सय्यद मोहम्मद सर्फराज, अमिर शेख, समीर शेख हे तिथे आले. यानंतर या तिघांनी व ३ महिलांनी पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने त्या तिनही महिलांना ताब्यात घेऊन इतर जमावास तत्काळ बाहेर जाण्यास सांगितले हा सर्व प्रकार झाल्यानंतर सय्यद सर्फराज याने धार्मिक तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने आपल्याला मारहाण झाली अशी ओरड करून करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच आपल्या मित्र मंडळींना बोलून घेऊन पोलिसांवर दबाव आणला आणि पोलिसांना खोटी तक्रार दाखल करण्यास प्रवृत्त केले हा सर्व प्रकार तोफखाना पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला असून या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधित तक्रारदाराची चौकशी करावी आणि इथून पुढे गुन्हा दाखल होताना शहानिशा करावी खोटे गुन्हे दाखल करू नये अशी मागणी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, नगरसेवक प्रदीप परदेशी, बाळासाहेबांची शिवसेनेचे शहराध्यक्ष दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख नगरसेवक सचिन जाधव, बंटी डापसे ,कुणाल भंडारी आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समक्ष भेटून निवेदन देऊन केली आहे.