अहिल्यानगर दिनांक १० जुलै
अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील तिसगावचा युवा नेता सध्या चांगलाच फॉर्मात असून महिलांना पुढे करून ब्लॅकमेलिंगचा फॉर्मुला जोरात सुरू आहे.
एका राष्ट्रीय पक्षाच्या युवा भैय्या बो पदाधिकाऱ्याने महिलांना पुढे करून काही लोकांना त्रास देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलांना पुढे करून पुरुषांना जाळ्यात अडकवण्याची सांगायचे पुरुष जाळ्यात अडकल्यानंतर त्याचे व्हिडिओ आणि ऑडिओ महिलांकरवी काढून घ्यायचे आणि मग त्या पुरुषाला ब्लॅकमेलिंग करून बक्कळ पैसा कमवायचा असा फंडा या युवक पदाधिकारी भैय्या बो करत असून असून हा रंगेल पदाधिकारी स्वतःला राष्ट्रीय पक्षाचा युवक पदाधिकारी म्हणत मिरवत आहे. मात्र त्याला कोणाचा वरदहस्त आहे या वरून चांगलेच चर्चा झडत असून सत्तेचा दूरउपयोग करून असे चुकीचे काम हा युवा पदाधिकारी करत असून आता त्याला ज्या लोकांचा वरदहस्त आहे असे बोलले जाते त्या राजकीय नेत्यानंपर्यंत त्या भैय्या बो ची ब्लॅकमेलिंगची खरी कहाणी जाणार असल्याचेही बोलले जातेय.

पाथर्डी तालुक्यातील एकाला फसवून लाखों रुपये घेऊन हा युवक सध्या मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशाप्रकारे फिरत आहे. ज्या राष्ट्रीय पक्षाने आपला अजेंडा महिलांना मान सन्मान आणि सक्षमीकरण करण्याचा ठेवला आहे. त्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अशा प्रकारे महिलांना पुढे करून ब्लॅकमेलिंग करून पैसे कमवण्याचा फंडा सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे अनोळखी आलेल्या फोन नंबर न उचलणे अथवा समोरून महिला बोलत असेल तर काळजीपूर्वक फोनवर बोलणे ही खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.