पालघर दि.२६ एप्रिल
पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना बोईसर पालघर रस्त्यावरील एका गृहसंकुलातील सदनिकेत २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया व चौकशी सुरू करण्यात आली आहे.
एका शिक्षकाच्या बदली प्रस्ताव प्रकरणी सानप यांनी लाचेची मागणी केली होती. त्याबाबतची तक्रार एसीबीकडे आली हाेती.एसीबीचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप व पथकाने सानप यांच्यावर सापळा रचून ही कारवाई केली.