अहमदनगर दि.७ जुलै
भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या कादिर मौलाना यांनी केलेल्या वक्तव्या मुळे हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या आहेत कारण कदिर मौलाना यांनी मध्यंतरी छत्रपती संभाजीनगर मध्ये बोलताना काही विधाने केली होती त्यावेळी औरंगजेबाचे समर्थन केलं होत यामुळे हिंदुत्ववादी संघटना आता संतप्त झाल्या असून भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी पक्षाचे मोठमोठे होर्डिंग लावले आहेत या होर्डिंग वर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे महात्मा फुले यांचे फोटो लावलेले आहेत आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा मोठा फोटो या होर्डिंग्ज वर लावण्यात आला आहे. महापुरुषांचे फोटो लावून कादिर मौलाना सारख्या लोकांना पक्षात प्रवेश दिला जात असल्यामुळे आणि तो औरंगजेबाचे समर्थन करत असल्याने हिंदू राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांसह विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नगर शहरातील नगर मनमाड महामार्गावरील भारत राष्ट्र समितीच्या होर्डिंग वर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने काळे फासून निषेध करण्यात आला आहे.
या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहरातील अनेक बोर्डवर या संघटनानी काळे फासले आहे.
कादिर मौलाना याने औंरंगजेबाचे उद्दत्तीकरण करण्याचा प्रयत्न केला असून राज्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारी जनता हे खपवून घेणार नाही असा इशारा हिंदू राष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय अडोळे यांनी दिला आहे.