Homeविशेषताबा प्रकार थांबता थांबेना.. नगर शहरात ताब्यांचे वाढते प्रकार सुरूच..

ताबा प्रकार थांबता थांबेना.. नगर शहरात ताब्यांचे वाढते प्रकार सुरूच..

advertisement

 अहमदनगर दि. ६ जुलै

अहमदनगर शहरात बेकायदेशीर ताबे मानणाऱ्यांची कारणामे थांबता थांबत नसल्याचे अनेक प्रकरणावरून दिसून येत आहे. मोकळ्या जमिनी मोकळे घर,मोकळे फ्लॅट यावर ताबे मारून ते परस्पर विकण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत विशेष म्हणजे काही प्रकरणात गुन्हे दाखल होऊनही मोकळे प्लॉट बनावट मालक उभे करून पुन्हा विक्री करण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. यावरून उपनिबंधक कार्यालयामधील भोंगळ कारभार समोर आला आहे.जी जागा वादग्रस्त आहे जी जागा बनावट मालक उभे करून विकली गेली आहे त्याबाबत रीतसर गुन्हा दाखल झाला आहे असे असतानाही पुन्हा ती जागा आरोपींनी बनावट मालक उभा करून विक्री केल्याचा खळबळ प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये उपनिबंधक कार्यालयाची उत्तुंग कामगिरी समोर आली आहे.

शिवसेनेने याबाबत काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन कल्याण रोडवरील या जागेबाबात प्रकार उघडकीस आणला होता तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना नगर शहरातील असे बनावट खरेदीखत आणि ताबे मांरणाऱ्यांबाबत सविस्तर निवेदन देऊन कायदेशीर कारवाई करण्याचे मागणी केली होती.

आमदार संग्राम जगताप यांनी सुद्धा नगर शहरात काही विशिष्ट समाजाच्या लोकांना हाताशी धरून मोकळ्या प्लॉटवर ताबे मारण्याचा प्रकार उघडकीस आणला होता ते ताबे पोलिसांनी मोकळे केले असले तरी अजून नवीन नवीन फंडे वापरून नगर शहरात ताबे मारण्याचे प्रकार सुरूच आहेत.

सावेडी उपनगर बुरुडगाव रोड केडगाव या भागात अजूनही असे प्रकार उघडकीस येत असून नगर जामखेड रोड वरील निंबोडी येथे एका अठरा गुंठे जागेचे मूळ मालक सोडून दुसऱ्याच बनावट मालकांनी ही जागा परस्पर विकण्याचा प्रकार समोर आला आहे. तर मूळ मालक हे नगरमध्ये नसून पुणे मुंबई मध्ये स्थायिक झाले आहेत मात्र त्यांना ही गोष्ट कळल्यानंतर मोठा धक्का बसला आहे आता हे प्रकरण मिटवण्यासाठी सर्वच प्रकाराने प्रयत्न सुरू आहेत.

छत्रपती संभाजी नगर रोडवरील एका छोट्या प्लॉटचा असाच काहीसा प्रकार समोर आला असून याबाबतही आता रीतसर तक्रार दाखल होऊ शकते यामध्ये सुद्धा राजकीय कार्यकर्ते असल्याचं समजतंय त्यामुळे नगर शहरात ताबा हा प्रकार दिवसान दिवस वाढतच चाललाय असंच या प्रकरणांवरून दिसून येतेय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular