अहमदनगर
शाळा कॉलेजला वय म्हणजे एक निखळ आणि उन्हाळ वय असतं चांगल्या वाईट गोष्टींची लवकर जाण होत नाही आणि अनेक खोट्या गोष्टींवर लवकर विश्वास टाकण्यात पण हे वय असतं त्यामुळे या वयात थोडी जरी चूक झाली तर ती चूक आयुष्यभर भोगावे लागते शाळा कॉलेज मधील वय म्हणजे काहीतरी
काबीज करणारं यश मिळवायचं, खेळाची मैदानं असो की स्पर्धा परीक्षांचे फड, ते गाजवायचे; देशाच्या बेरोजगारीला हातभार न लावता स्वतःच्या पायावर उभे राहण्याची स्वप्नं पाहायच वय .आई-वडिलांची स्वप्नं पुरी करायची त्या साठी मेहनत घेण्याचे वय त्या वयात शाळा-कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये व्यसनं करायची, कॉफी शॉपमध्ये ड्रग्ज वा हुक्का सेवनकरायचा, एकमेकांसोबत अनैतिक, बेकायदेशीर व अश्लील कृत्यं करायची, सीसीटीव्ही नसलेल्या कॅफेमध्ये ‘प्रायव्हसी एन्जॉय’ करायची, बर्थ डे पार्ट्यांच्या नावाखाली नको त्या पार्ट्या साजऱ्या करायच्या हे उद्याच्या भारताच्या तरुण-तरुणींसाठी चिंताजनक आहे.
सर्वच कॉफी शॉप मध्ये वाईट गोष्टी चालतात असे नाही मात्र काही ठराविक कॉफी शॉप मध्ये अशा चुकीच्या गोष्टींना उत्तेजन दिले जाते त्यामुळे ही कॉफी शॉप संकल्पना तरुण वयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असून पालकांसाठी तर अत्यंत धोकादायक गोष्ट आहे त्यामुळे आपला मुलगा अथवा मुलगी कुठे जाते यावर लक्ष ठेवणे पालकाची जबाबदारी आहे. शाळा कॉलेज एक्सट्रा लेक्चर किंवा क्लासच्या नावाखाली मुलं बाहेर पडतात मात्र बाहेर पडल्यानंतर ती त्याच ठिकाणी जातात का? यावर लक्ष ठेवण्याची जेवढी जबाबदारी पालकांची आहे तेवढीच जबाबदारी क्लासला ज्या ठिकाणी मुलं जातात त्या क्लासची सुद्धा जबाबदारी आहे. जग आता आधुनिक झाले आहे प्रत्येकाकडे मोबाईल आले आहेत अनेक सॉफ्टवेअर डेव्हलप झाले आहेत. त्यामुळे शाळा आणि कॉलेज तसेच प्रायव्हेट क्लास मध्ये मुले गेली की तसा एक मेसेज तिथून पालकांना भेटेल अशी सोय करणे गरजेचे आहे जर मुलगा आला नाही तर त्याची गैरहजेरी सुद्धा पालकांना कळणे गरजेचे आहे. तेव्हाच या चुकीच्या गोष्टींवर अंकुश बसू शकतो.
कोरोना नंतर प्रत्येकाकडे मास आले मात्र हा मास्कचा उपयोग आता रोगराई रोखण्यासाठी नाही तर ओळख लपवण्यासाठी होतो आणि या मास्कचा आणि स्कार्फ बांधून मुलं-मुली ठिकठिकाणी लॉजवर आणि कॅफेवर जाताना दिसून येतात.
जनरेशन गॅप वा जुनाट व बुरसटलेले विचार या
नावाखाली टीका करत करत आधुनिकतेच्या नावावर
अनैतिक व बेकायदेशीर वर्तन व त्याचं समर्थन करणारी अनेक मंडळी आहेत मात्र या मंडळींना एकच सांगायचे चुकीच्या गोष्टींना समर्थन देऊच नका कारण तरुण वयात झालेली चूक ही फार मोठी असते मग ती नैतिक अनैतिक कोणतीही असो प्रत्येकाच्या घरात मुलगा आणि मुलगी असतोच त्यामुळे दुसऱ्यावर तोंडसुख घेताना आपल्या घरात काय चाललंय हे समजून घेणे ही गरजेचे आहे.