अहमदनगर दि.९ ऑक्टोबर
मराठा उद्योजक अहमदनगर यांनी कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे यासाठीच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मोडी लिपीचे तज्ञ अभ्यासक डॉ.संतोष जी यादव हे कुणबी दाखल्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.१९ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता कोहिनूर मंगल कार्यालय कार्यालयात हा मार्गदर्शन मेळावा होणार असून त्याच बरोबरअण्णासाहेब पाटील योजना संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.तरी सर्व बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा उद्योजक यांच्या वतीने करण्यात आले आहे.