Home Uncategorized तरुण तरुणींना अश्लीलचाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ‘गोल्डन कॅफे’ वर तोफखाना...

तरुण तरुणींना अश्लीलचाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ‘गोल्डन कॅफे’ वर तोफखाना पोलिसांचा छापा..

अहिल्यानगर दिनांक 11 मे

कॅफेच्या नावाखाली कॉलेज तरुण तरुणींना
अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलव्ध करून देणा-या गोल्डन कॅफेवर तोफखाना पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.


बालिकाश्रम रोडवरील गोल्डन कॅफे या ठिकाणी तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी कॅफेच्या आत मध्ये कप्पे करून जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती त्या नुसार तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह गोल्डन कॅफे या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता फर्निचरच्या कंपारमॅन्टच्या आडोशाला काही तरुण-तरुणी अश्लिल चाळे करताना दिसून आले. गोल्डन कॅफेचे मालक ओंकार कैलास ताठे याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, नगर शहर विभाग यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, आनंद कोकरे, तोफखाना पो. स्टे अहिल्यानगर यांचे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व पोलीस अंमलदार यांनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version