Home शहर चाईल्ड केअर हॉस्पिटल Plus क्रिटीकल केअर सेंटर हॉस्पिटलचा आज भव्य शुभारंभ..

चाईल्ड केअर हॉस्पिटल Plus क्रिटीकल केअर सेंटर हॉस्पिटलचा आज भव्य शुभारंभ..

अहमदनगर दिनांक १५ जुलै
अहमदनगर शहरात आज चाईल्ड केअर हॉस्पिटल
Plus क्रिटीकल केअर सेंटर(लहान मुलांचे हॉस्पिटल) चाल भव्य उद्घाटन सोहळा आज सायंकाळी सहा वाजता होणार असून या हॉस्पिटलचा शुभारंभ वेदशास्त्रसंपन्न श्री. पांडुरंग (काका) देशमुख यांच्या शुभहस्ते तर महंत साध्वी नर्मदापुरीजी गुरूस्वामी ॐकारनंदजी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा आहे.

नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ. गणेश मिसाळ,चाईल्ड केअर हॉस्पिटलच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सीमा मिसाळ,नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ. उज्वला शिरसाठ, यांच्या मार्गदर्शनाखाली या नवीन हॉस्पिटल ची वाटचाल होणार असून हे हॉस्पिटल अद्यावत उपकरणांनी सुसज्ज आहे 24 तास लहान मुलांसाठी अत्यावश्यक सेवा यासह संपूर्ण नर्सिंग स्टाफ आणि मुलांची काळजी घेण्यासाठी विविध डॉक्टरांची टीम या ठिकाणी कार्यरत राहणार आहे.

चाईल्ड केअर हॉस्पिटल हे नगर मनमाड महामार्गावर हॉटेल उभे राहायचे समोर असून अहमदनगर जुने शहर आणि नवीन उपनगर यांच्या बरोबर मधोमध हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी 24 तास अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version