अहमदनगर : दि.१५ जुलै
नगर शहर विधानसभेच्या तयारीसाठी येत्या 13 ऑगस्ट रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने काँग्रेस चे राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव आणि काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले हे नगर दौऱ्यावर येत असून ते 13 ऑगस्टला सकाळी 11 वाजता चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करणार असून त्यानंतर ते दुपारी 3 वाजता नगर शहरात पत्रकार परिषद घेऊन नगर विधानसभा मतदार संघाबाबत भाष्य करणार असल्याची माहिती काँग्रेस च्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून वरिष्ठ पातळीपासून सर्वांनी प्रयत्न केले होते मात्र लोकसभेऐवजी विधानसभेला संधी दिली जाईल असा शब्द वरिष्ठांना दिला गेला असल्याने आता वरिष्ठ पातळीवरूनच नगर शहरात विधानसभेची चाचपणी व रणनीती आखण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग यादव साहेब व काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले साहेब येणार असल्याचे समजतेय.