अहमदनगर :दि.२१ एप्रिल
शहरात अनेक वर्षांपासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी प्रलंबित आहे. तरी महापालिका प्रशासनाने पुर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला गती द्यावी, चौथाऱ्याच्या कामाची ई-निविदा प्रक्रिया झालेली असताना देखील संबंधित विभागाकडून चौथाऱ्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही, तरी पुढील सात दिवसात हि सर्व प्रक्रिया पार पडून कामाला सुरुवात करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक कृती समितीच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार समाजाला दिशा व प्रेरणा देणारे आहे. तरी प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम तात्काळ सुरू करा अशी मागणी कृती समितीच्या वतीने मनपा आयुक्त यांच्याकडे करण्यात आली. यावेळी या प्रकरणी लवकरात लवकर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूn तात्काळ काम सुरु केले जाईल असे आश्वासन आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी कृती समितीला दिले. यावेळी कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.