Home राज्य महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवर लाखोंची उधळण तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे दुर्लक्ष, माहिती...

महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवर लाखोंची उधळण तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे दुर्लक्ष, माहिती अधिकारातून समोर आली धक्कादायक माहिती…

मुंबई दिनांक 7 मार्च

एकीकडे छावा चित्रपट करोडो रुपयांची कमाई करत आहेत तर संपूर्ण देशात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रति मनामनात एक ज्वलंत आग तयार होताना दिसत आहेत मात्र दुसरीकडे याउलट परिस्थिती आहे ज्या औरंगजेबाने महाराष्ट्राच्या छाताडावर नंगानाच केला त्याच औरंगजेबाचे उदत्तीकरण सरकार करत असल्याचं समोर आले आहे.

केंद्रीय पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीवर 13 वर्षांत लाखो रुपयांचा खर्च केला आहे.. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. आणखी गंभीर मुद्दा यापुढेच आहे. सिंधुदुर्गच्या मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ काही हजारांचा खर्च करण्यात आला असल्याचं हिंदू जनजागृती संघटनेनं सांगितलं आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिवरायांच्या मंदिराला भरीव मदतीची मागणी
महाराष्ट्रातील राज्यकर्ते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राज्यकारभार चालवतात. मात्र याच राज्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडं लक्ष द्यायला वेळ नाही. शिवरायांच्या किल्ले सिंधुदुर्गावरील मंदिराला सरकारकडून अवघे तीन हजार रुपये अनुदान दिलं जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दुसरीकडे केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या संभाजीनगरच्या कबरीवर लाखोंची उधळपट्टी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंदू जनजागृती समितीनं माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीत 13 वर्षांत साडेसहा लाखांचा खर्च केला आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेनं केला आहे.

कोट्यवधी रुपये खर्चून शिवरायांच्या स्मारकांचा संकल्प सरकारनं सोडला आहे. मात्र शिवरायांच्या महाराष्ट्रातील मंदिरावर खर्च करण्यात सरकार हात आखडता का घेतं असा सवाल शिवप्रेमींकडून विचारला जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version