नगर दिनांक ७ मार्च – अहिल्यानगर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सक्रिय सदस्य नोंदणीचे फॉर्म भरुन घेण्यात येत आहेत.त्याप्रमाणे आज मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा फॉर्म सक्रिय नोंदणी अभियान चे सहसंयोजक तथा उपाध्यक्ष ॲड.धनंजय जाधव यांनी भरुन घेतला.
याप्रसंगी बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की,भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून पक्षामध्ये कार्यकर्ता हाच प्रमुख नेता होतो.संघटनेत कार्यकर्त्याला महत्त्व आहे.संधटनेमुळे भाजपाची पुर्ण देशात सत्ता आहे.तसेच अहिल्यानगर शहरातील भाजप पदाधिकार्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे सभासद नोंदणी करून उदिष्ट्य पुर्ण केले त्यांचेदेखील मी अभिनंदन करतो.
तसेच यावेळी ॲड.धनंजय जाधव म्हणाले की,डॅा.सुजय विखे पाटील यांचा पक्षाच्या प्रत्येक अभियानात सहभाग असतो.ते प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद देत असतात..