Home राज्य छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रम गाथा सांगणारा अफझल खान वध म्हणजेच शिवप्रताप हा...

छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रम गाथा सांगणारा अफझल खान वध म्हणजेच शिवप्रताप हा देखावा प्रतापगडावर उभारणार सरकारचा निर्णय

 मुंबई : दि.१५ नोव्हेंबर

अफझल खानाच्या कबरीवरील बेकायदा अतिक्रमण हटवल्यानंतर पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रम गाथा सांगणारा अफझल खान वध म्हणजेच शिवप्रताप हा देखावा उभारला जाणार आहे. शिवप्रतापाचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून लाईट अॅण्ड साऊंड शो या देखाव्याचे आकर्षण असणार आहे.

 गडाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. “शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे!”, अशी माहिती मंत्री लोढा यांनी दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version