अहमदनगर दि.१३ जानेवारी
अहमदनगर येथील प्रल्हाद शिवाजी यादव यास न्यायालयाने चार महिने कारावास व चार लाख पंचवीस हजार नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली आहे. प्रल्हाद यादव यांनी फिर्यादी गोरक्षनाथ सातपुते याचे कडून रुपये दोन लाख पन्नास हजार हात उसने घेतले व त्याचे परतफेडीसाठी धनादेश दिला होता. तो धनादेश वाटला नाही. म्हणुन सातपुते यांनी यादव याचे विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अक्ट कलम १३८ अन्वये फौजदारी खटला दाखल केला होता. या खटल्यात यादव यांचा बचाव कोर्टाने फेटाळून लावला व सादर केलेला पुराव्या च्या आधारे यादव यांनी गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने यादव हे शिक्षेसाठी पात्र असल्याचे निष्कर्ष न्यायालयाने काढले.
अॅड सुहास टोणे यांनी सातपुते यांचे वतीने न्यायालयात केलेला युक्तिवाद ग्राह्य़ धरून आरोपी प्रल्हाद यादव यास कारावास व नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली. न्याय मिळाला व चार लाख पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळाल्यामुळे न्यायालयाच्या निकाला बाबत सातपुते यांनी समाधान व्यक्त केले आहे. अॅड सुहास टोणे यांना अँड बापू अडागळे, अँड अबोली जोशी यांनी सहकार्य केले.