अहमदनगर दि.१६ सप्टेंबर
अहमदनगर शहरात चार दिवसांपूर्वी अल्पवयीन तीन मुली घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. सुरुवातीला मुली मैत्रिणीकडे कुठेतरी असतील म्हणून पोलिसांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली मात्र त्याचवेळी या मुली पळून नेल्याची चर्चा सुरू झाली त्यानंतर या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रकार झाला त्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली तर नगर शहर बंद करण्याचे आवहान काही हिंदुत्वाची संघटनांनी केले होते. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून मुलींच्या मोबाईल वरून शोध घेण्यास सुरुवात केली आणि अनेक धक्कादायक गोष्टी या तपासातून पुढे आल्या. आणि अखेर या मुली हैदराबाद येथे सापडले असून तोफखाना पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे त्या मुलींना सुखरूप स्वाधीन केले आहे.
मात्र या प्रकारामुळे पोलिसांसह कुटुंबीयांना आणि त्या मुलींच्या मित्रांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे विशेष म्हणजे या मुली ज्या दिवशी पळून गेल्या त्या दिवशी दिवसभर त्यांच्या मित्रांबरोबर भटकंती करायला गेल्या होत्या. मात्र दिवसभर बाहेर असल्यामुळे घरच्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल या भीतीपोटी या तीन मुलींनी घरी जाण्याचा निर्णय रद्द केला तर त्यांच्यापैकी एक मुलगी घरी पोहोचली होती काही काळ नगर शहरातील एका बागेत घातल्यानंतर त्यांनी आपल्या मित्रांना फोन करून कुठेतरी राहण्याची सोय करावी अशी विनंती केली. मात्र सोय मिळत नसल्याने या मुलींनी थेट नगरचे रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वेने पुण्याला आणि तेथून हैदराबादला पोहोचल्या. यातील एका मुलीच्या नातेवाईकाचे हैदराबादमध्ये हॉटेल आहे. या हॉटेलवर गेल्यानंतर त्या नातेवाईकाने घटनेचे गांभीर्य ओळखून त्या मुलींना समजावून सांगत पोलिसांशी संपर्क करण्याचे सांगितले इथेही आसरा मिळत नसल्याने अखेर त्या मुलींनी थेट पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि मग हैदराबाद पोलिसांनी अहमदनगर पोलिसांची संपर्क साधून मुली सुखरूप असल्याचं सांगितल्यानंतर तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशिवरे यांच्यासह एक पथक हैदराबाद येथे जाऊन त्यांनी मुलींना सुखरूप नगर मध्ये आणले आणि कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
मात्र या घटनेने अहमदनगर शहर चांगलेच हादरून गेले होते पालकांनीही आता आपल्या मुलींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या मुली नेमक्या काय करतात कोणाबरोबर फिरतात कुठे कुठे जातात तसेच त्यांना वापरायला दिलेला मोबाईल नेमका कशासाठी वापरला जातो याची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे कारण अल्लडपणामध्ये अनेक गंभीर चुका मुलांकडून होत असतात मात्र या चुका पुढे संपूर्ण आयुष्यभर एक गंभीर समस्या म्हणून एखाद्या कुटुंबीयांच्या मागे लागू शकतात त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींकडे आणि मुलांकडं लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा एखादी मोठी घटना घडल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच सावध होणे गरजेचे आहे.