अहमदनगर दि.१५ सप्टेंबर
बुऱ्हानगर येथील एडवोकेट अभिषेक भगत आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आपल्या जीवित आला धोका असल्याचा तक्रार अर्ज विनोद राजू साळवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे. दोन दिवसांपूर्वी विनोद राजू साळवे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये ऍडव्होकेट अभिषेक विजय भगत याच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ करणे या कलमाखाली गुन्हा नोंद केला होता त्यानंतर एडवोकेट अभिषेक भगत यांनी राहुरी नगर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे तसेच शिवसेनेचे आणि काँग्रेसचे काही नेते यांच्या समवेत पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप खोटे असून ते रद्द करावेत तसेच विनोद राजू साळवे याचे अवैद्य धंदे असल्याचा उल्लेखही या पत्रकार परिषदेत केला होता. तसेच एडवोकेट अभिषेक भगत यांनी काही सोशल मीडियावर स्वतःचे काही व्हिडिओ प्रसारित करून विनोद साळवे यांची बदनामी केली होती. त्याप्रकरणी सुद्धा आता भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दाखल पत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून. एडवोकेट अभिषेक विजय भगत यांचे विविध राजकीय पुढाऱ्यांची घनिष्ट संबंध आहेत आणि ते श्रीमंत असल्याने आमच्यासारख्या गोरगरीब लोकांवर कधीही हल्ला करू शकतात त्यामुळे भगत कुटुंबीयांपासून आपल्या जीवितेला धोका असून आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार राहुरी नगर मतदार संघाचे आमदार प्राजक तनपुरे आणि अभिषेक भगत कुटुंबीय असतील असे या अर्जात म्हटले आहे.
तर हा सर्वसामान्य जनतेवर अन्याय असून विनोद साळवे यांच्यावर झालेल्या अन्याबाबत पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आरोपील लवकरात लवकर अटक करावी आणि इथून पुढे साळवे कुटुंबीयांना काही त्रास झाला तर आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा विशाल साळवे यांनी दिलाय