अहमदनगर दि.२८ डिसेंबर – समाजामध्ये कायद्याची माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी विधीज्ञ आपले काम करत असतात प्रत्येकाने कायद्याचे पालन केल्यास समाजाला दिशा मिळेल.विधीज्ञ हे समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. अहमदनगर शहर वकील संघाच्या वतीने समाजामध्ये कायद्याविषयी जनजागृती सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर शहर वकील संघाच्या नवनिर्वाचक पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे मा. सभापती अविनाश घुले, प्रा.सिताराम काकडे, अभय गुजराती, वरिष्ठ विधिज्ञ सुभाष भोर, रवींद्र शितोळे, भूषण बराटे, सागर सोनवणे, योगेश नेमाने, अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष राजाभाऊ शिर्के, सचिव गौरव दांगट, महिला सचिव अशा गोंधळे, कार्यकारी सदस्य रोहित कळमकर, रामेश्वर कराळे,विशाल पठारे,अभिजीत पूपाल आदी उपस्थित होते.
अध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, अहमदनगर शहर वकील संघाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये गावोगावी कायदे विषयी मेळावे घेतले जातात याचबरोबर न्यायालयातील लोकादाल मध्ये जास्तीत जास्त प्रकरणे समोपचारने मिटवण्याचा प्रयत्न केला जातो याचबरोबर वकिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अहमदनगर शहर वकील संघ काम करत आहे असे ते म्हणाले.