Homeशहरविखेंचा झटका... शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नव्याने टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनला आडव्या येणाऱ्या...

विखेंचा झटका… शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नव्याने टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनला आडव्या येणाऱ्या त्या बिल्डरला खा. सुजय विखेंचा झटका

advertisement

अहमदनगर दि.२८ डिसेंबर

नगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नव्याने टाकण्यात येणाऱ्या अमृत पाणी योजने अंतर्गत मुळा डॅम ते वसंत टेकडी येथे नवीन 38 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली असून विळद घाट परिसरात मातोश्री आश्रम शेजारी एका बिल्डर ने या पाईपलाईनचे 12 मीटर काम अडवले आहे. त्यामुळे 38 किलोमीटर ची लाईन टाकून सुद्धा फक्त 12 मीटर मुळे योजनेचे काम रखडले होते. सुमारे 2 महिन्या पासून या बिल्डर ने काम अडवून नगर शहरातील सुमारे 7लाख लोकांना वेठीस धरण्याचे काम केले होते.अधिकारी वर्गाने विनंती करून सुद्धा तो बिल्डर कोणाचे ऐकण्यास तयार नव्हता.

ही बाब जेव्हा आढावा बैठकीत खासदार सुजय विखे पाटील यांच्या समोर आली आणि त्या बिल्डर ने केलेल्या अवैध उत्खनाचे फोटो निदर्शनास आले तेव्हा तात्काळ विखे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावला आणि सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आणि चुकीचे काम झाले असल्यास दंड करण्यास सांगितले , त्यामुळे अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अडवून नगरच्या नागरिकांना पाण्या पासून वंचित ठेवणाऱ्या त्या बिल्डर चे धाबे दणाणले असून विखे पाटील यांच्या झटक्यामुळे लवकरच अडवलेले 12 मीटर पाईप टाकायचे काम पूर्ण होऊन योजना पूर्ण होण्यास मदत होईल अशी मनपा वर्तुळात चर्चा आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular