अहमदनगर दि.२३ डिसेंबर
– काही महिन्यांपूर्वीच हॉस्पिटल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आय.सी.यु. विभागाला आग लागून काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. तरीही हॉस्पिटल प्रशासन रुग्णांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही. सर्वसामान्य घरातील रुग्ण ज्यांची दोन वेळेच्या जेवणाचीही अडचण असते असेच गरजू लोक हे जिल्हा रुग्णालयात पैशांच्या अभावामुळे उपचारासाठी येत असतात.खाजगी रुग्णालयातील आय.सी.यु. चे दर रुग्णांना परवडणारे नसतात. त्यावेळेस रुग्ण हे गंभीर आजाराशी झुंज देत असताना ते मोठ्या आशेने सरकारी रुग्णालयाचा आधार घेण्यासाठी रुग्णालयात येतात. पण रात्री अपरात्री आपल्या जिल्हा रूग्णालयात असे निदर्शनास येते की,आय.सी.यु. विभाग फुल आहे जागा नाही. याचबरोबर डॉक्टर / नर्स उपलब्ध नाहीत,खाजगी दवाखान्यात घेऊन जा, अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जातात अन्यथा पुणे येथील ससून हॉस्पिटल ला घेऊन जा.घेऊन जाण्याची परिस्थीती नसताना देखिल.कित्येक तास चर्चेअभावी रुग्णाला अत्यंत गंभीर अवस्थेत ताटकळत ठेवले जाते. अशी उत्तरे रुग्णाच्या नातेवाईकांना दिली जातात.
अत्यंत आवश्यक अशा या प्रकरणांमध्ये रुग्णांना सेवा मिळणे गरचेचे असताना देखील आपल्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कित्येक रुग्णांना आरोग्यसेवेअभावी आपला जीव गमवावा लागत आहे. सिव्हिल हॉस्पिटलचा जळीत झालेला अतिदक्षता विभाग (आय.सी.यू.) हा नव्याने तयार होऊन कित्येक महिन्यांपासून केवळ उद्घाटनाअभावी बंद ठेवण्यात आला आहे. रुग्णसेवेसाठी अत्यंत तातडीचा असणारा हा अतिदक्षता विभाग जर लवकरात लवकर रुग्णसेवेसाठी खुला करण्यात आला नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस च्या वतीने आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा वैभव ढाकणे यांनी दिला समवेत सामाजिक कार्यकर्ते सोन्याबापू घेंबुड,माउली जाधव,ऋषि गवळी,तुका कोतकर,ॲड. शुभम बंब,शिवम् ठुबे,तुषार हांगे,अनिकेत लोंढे,अमोल ठानगे,ऋषि बागल,भाऊ वनवे,ओंकार अव्हाड,ऋषि अव्हाड,राधेय दांगट,तनय बोरुडे,यश रासकर,गौरव रासकर,संकेत कु-हे आदी उपस्थित होते.