Home Uncategorized दोन दिवसांपूर्वी संपर्क प्रमुखांच्या बैठकीला उपस्थित आणि रात्रीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात...

दोन दिवसांपूर्वी संपर्क प्रमुखांच्या बैठकीला उपस्थित आणि रात्रीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश

अहमदनगर दि.२१ जुलै

सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनित शिंदे यांच्या
नेतृत्वाखाली नगर शहरातील आजी माजी नागरसेवकांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे नगर शहरामध्ये दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीमध्ये आणि नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत नगर शहरात नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेण्यात आली होती यामध्ये सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली होती.मात्र अनेकांची संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यावरच नाराजी होती 24 पैकी फक्त दहा नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते तर बाकीचे नगरसेवक आपल्या संपर्कात असून ते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याची माहिती संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी दिली होती. मात्र विशेष म्हणजे बैठकीला उपस्थित असलेले दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे सुपुत्र नगरसेवक योगीराज गाडे आणि शशिकांत गाडे यांचे बंधू रमाकांत गाडे यांनीच थेट एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे. राज्यात जे चित्र दिसत आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ उतरलेले आमदाराच एकनाथ शिंदे गटात प्रवेश करतात तसाच काहीच प्रकार नगर शहरातही घडला आहे.

नगर दक्षिण जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या बाबत वरिष्ठांपर्यंत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत राष्ट्रवादीचे आमदारांसोबत फिक्सिंग करत असल्याचा आरोप प्रत्येक वेळी केली जाते आशा अनेक तक्रारी होऊनही संपर्कप्रमुख बदलत नसल्याने अनेक जण संपर्कप्रमुखांवर नाराज होऊन एकनाथ शिंदे गटाकडे जात असल्याचे भावना अनेकांनी खाजगीत व्यक्त केली आहे. शहरातील राजकारण पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधील काही ठराविक नगरसेवक पदाधिकारी यांची मतं जुळ्लेली आहेत. मात्र अनेक वर्षापासून नगर शहरात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हेच राजकीय चित्र दिसून आले आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला अनेक शिवसैनिक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिल आहे.

मुंमुंबईत झालेल्या या सोहळ्यानंतर नगर शहरातील अजून काही पदाधिकारी नगरसेवक एकनाथ शिंदे गटात जाणार आहेत.मात्र काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे अनेक जण सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत त्यामुळे नगर शहरातून मोठ्या प्रमाणात समर्थक एकनाथ शिंदे गटात जाऊ शकतात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version