दिल्ली दि.९ जुलै
12 जुलै किंवा 13 जुलै रोजी तेरा मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची खात्रीशीर माहिती दिल्लीवरून मिळत असून शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली आहे. यामध्ये भाजपचे आठ तर शिंदे गटाचे पाच जण शपथ घेणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
ज्याप्रमाणे भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन धक्का दिला होता त्याप्रमाणे आता भाजपकडून मंत्री पदासाठी नवीन नावे मंत्री पदासाठी येऊ शकतात असाही शक्यता नाकारता येत नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडवणीस एकनाथ शिंदे यांची सुमारे साडेतीन तास चर्चा झाली असून या चर्चेमध्ये नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी द्यावी असा आग्रह अमित शहा यांनी धरल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता अनेक नवीन चेहरे मंत्री मंडळात दिसू शकतात.