अहमदनगर दि.२९ नोव्हेंबर
अहमदनगच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अविनाश चव्हाण नावाच्या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या युवकाकडे सापडलेल्या चिठ्ठीत तो श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील असल्याची माहिती समजतेय चिठ्ठी मधील माहितीनुसार तो युवक घोटवी गावाचा सरपंच असल्याच समजतंय. जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचारी इरफान शेख यांनी तााातडीने या युवकाला शासकीय रुग्णालयात दाखल केलंय.
त्या युवकाकडे सापडलेल्या चिठ्ठीमध्ये प्रेम संबंधातून त्रास होत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे मात्र आता पोलीस तपासातच सत्य काय ते समोर येइल