अहिल्यानगर दिनांक 28 ऑक्टोबर
अहिल्यानगर शहरात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडेल अशी घटना घडली असून शहरातील पाच डॉक्टरांवर गंभीर गुन्हे शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत मात्र गुन्हा दखल होऊनही दहा दिवसानंतरही या पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही ही आश्चर्याची बाब म्हणता येईल.कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक म्हणून काही काळातच अहिल्यानगर जिल्ह्यात सोमनाथ घार्गे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला मात्र गंभीर गुन्ह्यातील आरोपी का अटक होत नाहीत या प्रश्नाकडे आता सामान्य नगरकर संशयाने पाहू लागला आहे.

डॉ.गोपाळ बहुरुपी (रा. न्युक्लीअस हॉस्पिटल), डॉ. सुधीर बोरकर (रा. पाईपलाईन रोड, अहिल्यानगर), डॉ. मुकुंद तांदळे (रा. सावेडी, अहिल्यानगर), डॉ. अक्षयदीप झावरे पाटील (रा. अहिल्यानगर), डॉ. सचिन पांडुळे (रा. अहिल्यानगर), या पाच डॉक्टरांवर औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फिरदी अशोक कराळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. इतर वेळेस जर आपण पाहिलं तर एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर आरोपी सापडत नसतील तर त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस स्टेशनमध्ये आणून दिवस दिवस बसवले जात असते मात्र या पाच डॉक्टरांबद्दल पोलिस प्रशासनाचा एवढा आखडता हात का आहे असा प्रश्न समोर येत आहे.
शहरातील गुन्हेगारी ज्याप्रमाणे कमी करण्यासाठी पोलीस तत्परतेने काम करत असते त्याप्रमाणे या प्रकरणात पोलिसांची भूमिका संतवतीने का सुरू आहे का पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव असल्यामुळे हा तपास थंड झाला आहे असे वाटू लागले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रकरणात चित्रपटातील तो डायलॉग म्हणजेच कानून के हात लंबे होते है हा लागू पडत नाही.