Home क्राईम काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्याविरोधात दिल्लीत एफआयआर...

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्याविरोधात दिल्लीत एफआयआर दाखल . नोकरी आणि लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप

मुंबई दि.२७ जून

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्याविरोधात दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये नोकरी आणि लग्नाच्या नावाखाली बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या पतीचा 2020 मध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झाल्यापासून पीडित तरुणी नोकरीच्या शोधात होती. त्यावेळी ती पीपी माधवनच्या संपर्कात आली.त्यांच्या वतीने महिलेला मुलाखतीसाठीही बोलावण्यात आले होते. आता तक्रारीत माधवनने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा दावा पीडितेने केला आहे.

माधवनला पीडितेसोबत लग्न करायचे होते, असे तक्रारीत म्हटले आहे. त्याने महिलेसोबत तिच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पीडितेने असाही दावा केला आहे की, यावर्षी फेब्रुवारीमध्ये माधवन तिला सुंदरनगर येथील फ्लॅटमध्ये घेऊन गेला होता. तेथे माधवनने पुन्हा महिलेसोबत तिच्या संमतीशिवाय संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version