अहमदनगर दि.२५ नोव्हेंबर
सावेडी परिसरात दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा सोडून सुमारे चार एकर नवीन जागेवर आरक्षण प्रास्तावित करण्याचा व सुमारे ३२ कोटी रुपयांना ती जागा विकत घेण्याचा बाबत महापालिकेने तयारी केली आहे. या दफनभूमी जागे बाबत आज २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या महासभेसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. मात्र या प्रस्तवाला शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी लेखी विरोध केला.
सावेडी भागात दफनभुमी आणि स्मशानभुमीसाठी गेल्या अनेक वर्षापासुन आरक्षित करण्यात आलेले आहे. तीच जागा ताब्यात घेवून त्याच जागेत दफनभुमी व स्मशानभुमी करण्यात यावी. सध्या महानगरपालिकेतील नगर रचना विभागाकडुन चुकीची व महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होईल, अशा पध्दतीने रिपोर्ट लिहून सर्व नगरसेवकांची प्रशासनाची दिशाभुल करण्यात आलेली आहे. नगर रचना विभागाने आरक्षीत जागा ताब्यात न घेता नविन जागा ३२ कोटी रूपयाला ४ एकर घ्यावी, असे सुचविले आहे. यामध्ये नगर रचनाकार व काही राजकीय पदाधिकारी हे मिळुन महानगरपालिकेचे नुकसान करण्याच्या तयारीत आहेत.या प्रकरणामध्ये मनपा आयुक्त यांनी जी टिप्पणी लिहीली आहे, ती पुर्णपणे नगर रचना विभागाच्या विरोधात असुन त्याचाही अभ्यास करण्यात यावा. यामध्ये नगर रचना विभाग व काही पदाधिकारी यांनी जुन्या जागेवरील आरक्षण उठविण्याचे व त्या मालकाकडुन आर्थिक देवाण-घेवाण झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासुन दफनभुमी व स्मशानभुमी हे आरक्षण असलेली जागा मुळ मालकाच्या ताब्यात देण्याचा घाट घातलेला आहे.
त्यामुळे या दफनभुमी व स्मशानभुमीच्या या प्रकरणात आरक्षण उठविणे किंवा नविन जागा खरेदी करणे यामध्ये महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार असुन यास सर्वस्वी नगर रचना विभाग व काही पदाधिकारी जबाबदार आहेत. तरी हा विषय पीठासीन अधिकारी म्हणुन आपण मंजुर करू नये. हा विषय बहुमताचे जोरावर मंजुर केल्यास आम्हांला नाईलाजास्तव शासन दरबारी अथवा उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असा आशयाचा लेखी विरोध शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला असून याची प्रत यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिली आहे.