Home Uncategorized नगरसेवकाने ठेकेदाराला धमकावून टक्केवारी मागत असल्याने नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी. नगरसेवकवर...

नगरसेवकाने ठेकेदाराला धमकावून टक्केवारी मागत असल्याने नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी. नगरसेवकवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. ठेकेदारांचे पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांना निवेदन.

अहमदनगर दि २ जून

अहमदनगर महानगरपालिका बांधकाम विभागामार्फत ठेकेदार शेख इरफान कासम यांचे प्रभाग क्रमांक 11 मधील हातमपुरा कमला नेहरू पार्क मधील वॉल कंपाउंड व काँक्रिटीकरण काम शंभर टक्के पूर्ण झाले असून नगरसेवक पंधरा टक्के पैशाची मागणी करत असल्यामुळे व न दिल्याने धमकावत असल्याच्या निषेधार्थ नगरसेवकाचे पद रद्द करण्याच्या मागणीसाठी मनपा उपायुक्त प्रदीप पठारे यांना निवेदन देताना ठेकेदार इरफान शेख, जरीन शेख, सर्फराज सय्यद, फैजान शेख, सुलतान शेख, शहनवाज शेख, फर्मान शेख, ऐसान शेख आदी उपस्थित होते.

ठेकेदार शेख इरफान कासम राहता झेंडीगेट हे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून अहमदनगर महानगरपालिका बांधकाम विभागामार्फत ठेकेदारी करत आहे त्यांचे स्वतःचे रजिस्टेशन नसल्यामुळे विविध मंजूर संस्था व शहानवाज शेख यांच्या नावावर काम करत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मंजूर संस्था व शहानवाज शेख यांच्या नावावरचे काम करून सुद्धा देयके मिळाले नाही. वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा देयक मिळेना. अहमदनगर महानगरपालिका बांधकाम विभागामार्फत ई-टेंडरिंग ऑनलाइन पद्धतीने नगर शहरातील विविध प्रभागातील कामे प्रसिद्धी करण्यात आले. तसेच  प्रभाग क्र.11 मधील हातमपुरा कमला नेहरू पार्क मधील वॉल कंपाउंड व काँक्रिटीकरणाचे काम घेतले व  ते 100 टक्के पूर्ण करून घेतले काम करताना नगरसेवक अविनाश हरीभाऊ घुले हे कामावर येऊन मला धमकावीत व पैशाची मागणी करू लागले. हे काम माझ्या प्रभागात आहे तू हे कामाचे 15 टक्के मला दे पैसे न दिल्यास मी तुझे कामाचे देयक व कामाबाबत अडवणूक करीन वारंवार फोन करून धमक्या देतआहे. व असे माझे प्रभागात ऑनलाइन काम करायचे नाही. तर तू जो संस्थेवर काम करीत आहे त्या संस्थेचे रजिस्टरला ब्लॉक लिस्ट मध्ये टाकेलं तरी मला पैसे ताबडतोब दे याप्रमाणे मला जबरदस्तीने वरील इसम दहशत निर्माण करीत आहे.

2020-21 या कालावधीत प्रभाग क्र.11 मध्ये 6 लाख 50 हजार अंदाजे रक्कमेचे काम शहानवाज शेख यांच्या नावावर केलेले असता. रक्कम रुपये 1 लाख 50 हजार नगरसेवक अविनाश घुले यांनी माझ्याकडून टक्केवारीच्या स्वरूपात घेतलेले आहेत. व माझी अडवणूक करून दमदाटी करून वारंवार फोन करून पैशाची मागणी करत आहे. मी छोटा ठेकेदार असून माझ्यावर गेल्या 12 ते 15 महिन्यापासून नगरसेवक अविनाश घुले हे धमकावून पैसे घेत आहे. न दिल्यास मला माझ्या जीवितास धोका निर्माण झाला असून माझे सर्व कुटुंब दहशतीत आहे. तरी संबंधित नगरसेवक याची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असुन संबंधित नगरसेवकाच्या विरोधात ठेकेदार यांनी पोलीस अधीक्षक यांना पुराव्यासहित निवेदन दिले असून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version