Home Uncategorized गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणारी टोळी तडीपार…महाराष्ट्रातील कोतवाली पोलिसांची पहिलीच...

गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणारी टोळी तडीपार…महाराष्ट्रातील कोतवाली पोलिसांची पहिलीच कामगिरी..

अहिल्यानगर दिनांक ३१ मे

गौवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करणारी गुन्हेगारी टोळी अहिल्यानगर स्थलसिमेच्या हद्दीतुन हद्दपार करण्यात आली असून राज्यातील ही पहिलीच कामगिरी म्हणता येईल.
कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या सिंडिकेट परिसरात मोठ्या प्रमाणात वंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्याचा व्यवसाय होता. याबाबत कोतवाली पोलिसांनी गंभीर दाखल घेऊन गोवंश जनावरांची कत्तल व मांस विक्री करणाऱ्या लोकांवर वेळोवेळी गुन्हे दाखल करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करत मांस विक्रीचे अड्डे उध्वस्त केले होते.

वारंवार गौमांस विक्री करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विक्रेत्यांवर कायद्याचा धाक रहावा त्यांनी भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करु नये यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 अन्वये ग ओवेस रशीद शेख, 24 वर्ष, रा. आंबेडकर चौक, शाळा क्र. 4. झेंडीगेट, अहिल्यानगर (टोळी प्रमुख),शोएब रौफ कुरेशी, यय २८ वर्षे, रा. कारी मस्जिद जवळ, बाबा बंगाली, अहिल्यानगर (टोळी सदस्य), फेसल अस्लम शेख, वय 19 वर्षे, रा. घर नं. 1846, हमालवाडा, आंबेडकर चौक, झेंडीगेट, अहिल्यानगर (टोळी सदस्य), मुसाबीर युनुस कुरेशी, वय 22 वर्षे, रा. झेंडीगेट, अहिल्यानगर (टोळी सदस्य) यांचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन टोळी हद्दपार प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात मंजूर साठी पाठवला होता. या टोळीतील विक्रेत्यांन विरोधात कोतोली पोलीस स्टेशन मध्ये वेळोवेळी 1499/2023 प्रमाणे भारतीय दंड संहिता 1860, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 सह प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम 1960 या प्रचलित कायद्यान्वये गुन्हे दाखल होते.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सदर टोळी हद्दपार प्रस्ताव चौकशी करून. हद्दपार टोळी प्रमुख व सदस्य यांनी संघटीतपणे महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असताना गोवंशीय जनावरांची कत्तल करुन मांस हे सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशा रितीने कब्जात बाळगुण विक्री करुन, गोवंशीय जनावरांची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना त्रास होईल अशा रित्तीने दोरीने दाटावाटीने बांधुन त्यांची कत्तल करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहे. त्यांचेविरुध्द दाखल गुन्हे, करण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई, जातीय दंगली घडविण्यासाठी लागणारी कारणे या बाबींचा व कायद्याला जुमानत नसलेल्या बाबींचा व्यापक विचार करुन टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना त्यांचे विरुध्द दाखल गुन्ह्याचे अनुशंगाने बचावाचे मुद्दे सादर करण्याची संधी देण्यात आली परंतु त्यांनी मोघम स्वरुपाची माहीती दिल्याने त्यांचेकडे समर्पक कारण नसल्याचे दिसून आले. त्यावरुन या टोळी विरुद्ध हद्दपारचे कारवाई करण्यात आली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version