Home Uncategorized भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अखेर “यांची”वर्णी..

भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अखेर “यांची”वर्णी..

अहिल्यानगर दिनांक 31 मे

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर भाजपने वरिष्ठ नेते रविंद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी पक्षीय स्तरावर मोठी जबाबदारी दिली. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने संघटन पर्व अभियान राबवले. त्या माध्यमातून भाजपने तब्बल दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही रणनीती आखण्यात येत आहे. त्यातच, आता भाजपने राज्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी भाजपच्या (BJP) 58 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे.


राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती जाहीर झाली होती मात्र नगर शहर जिल्हाध्यक्षाची निवड राखून ठेवण्यात आली होती. नगर शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच झाली होती. विद्यमान जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सचिन पारखी, बाबासाहेब वाकळे, धनंजय जाधव व अनिल मोहिते यांनी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली होती. अखेर या पदाची जबाबदारी अनिल मोहिते यांच्यावर पडली असून. आगामी काळातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनिल मोहिते यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढवणे त्याचबरोबर मित्र पक्षांची युती करून जागा वाटपात भाजपचे स्थान बळकट करणे आदी मोठे आव्हाने त्यांच्यासमोर असणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version