Homeजगाची सफरनंग्या तलवारी,कोयते घेऊन मिरवणाऱ्या गुंडांचे शहर नव्हे तर शांत शहर म्हणून नगर...

नंग्या तलवारी,कोयते घेऊन मिरवणाऱ्या गुंडांचे शहर नव्हे तर शांत शहर म्हणून नगर शहराची ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज…

advertisement

अहमदनगर दि.३० जुलै

नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून खून आणि नंग्या तलवारी घेऊन फिरण्याच्या घटना घडल्या आहेत. ओंकार भागानगरे याच्या खून प्रकरणातही तलवारींचा सर्रास वापर करण्यात आला होता. नंग्या तलवारी घेऊन पाठलाग करून भागानगरे याचा खून करण्यात आला होता. त्याचप्रमाणे नगर शहरात गुरुवारी रात्री पाईपलाईन रोड परिसरातील एचडीएफसी बँकेच्या समोर पुन्हा एकदा नंग्या तलवारी कोयते घेऊन काही तरुणांनी मयूर सोमवंशी याच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात मयूर याच्या हातावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नगर शहरातील मॅक केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या दोन्ही घटनेत तलवारी कोयत्यांचा सर्रास वापर करण्यात आला आहे. तर पाईपलाईन रोडवरील घटनेतील हल्ला करणाऱ्या तरुणांनी इंस्टाग्राम वर स्टेटस ठेवले होते ते स्टेटस ही आता चांगलेच व्हायरल होत असून तरुणांना पोलिसांची भीतीच उरली नाही का? असा प्रश्न समोर येऊ राहिला आहे. चित्रपटांमधील स्टेटस ठेवून मुलं प्रत्यक्ष गुन्हेगारी क्षेत्रात वळतात याकडे पोलिसांपेक्षा जास्त त्या तरुणांच्या कुटुंबियांचा निष्काळजीपणा या तरुणांना गुन्हेगारी क्षेत्रात ढकलण्यास कारणीभूत आहे का? असा सवाल उपस्थित राहतोय.

वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात पुरेसे पोलीस बळ नसल्याने पोलिसांवरही कामाच्या मर्यादा येतात. गुन्हेगारी रोखण्याचे सोडून पोलिसांना विविध सण उत्सव मोर्चे सभा यांच्या बंदोबस्तातच जास्त वेळ खर्च करावा लागतो त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडे वेळच उरत नसल्याने आजकालचे तरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे सहजपणे उपलब्ध होणारे नशेचे साधने आणि बेरोजगारीमुळे तरुण मुले तासंतास एकत्र घालून वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करण्याचे प्रमाणही वाढत आहे. रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत अनेक टोळके शहराच्या विविध भागाच्या अंधारात काय करतात हे पोलिसांप्रमाणे त्या तरुणांच्या कुटुंबाने ही पाहणे गरजेचे आहे.

आपला मुलगा कोणा बरोबर राहतो दिवसभर काय करतो रात्री उशिरा येण्याचं कारण काय या सर्व गोष्टीवर कुटुंबातील सदस्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे आणि या गोष्टींवर पालकांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

एखादा गुन्हा घडला की सर्वजण पोलिसांकडे बोट दाखवतात गुन्हेगारी रोखण्याचा काम पोलिसांचं आहे. त्याचप्रमाणे नगर शहरातील प्रत्येक जबाबदार नागरिकाचे सुद्धा आहे. मात्र आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून आरोप करणे सोपं असतं मात्र जेव्हा आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्य अशा गुन्हेगारीला बळी पडतो किंवा गुन्हेगाराकडून आपल्या कुटुंबातील व्यक्तीला इजा होते तेव्हा आपल्याला कळते की आपण सर्वजण मिळून लढायला हवं त्यामुळे प्रत्येक दक्ष नगरकराने या गोष्टीचा विचार करणे गरजेचे असून भविष्यात बेरोजगारी वाढत असल्यामुळे आणि नशेची साधने स्वस्तात आणि सहजपणे उपलब्ध होत असल्याने भविष्यात अशा साधनांमुळे गुन्हेगारी वाढत जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकावर ही जबाबदारी आहे की आपला मुलगा आणि आपल्या कुटुंबातील सदस्य यापासून दूर कसा राहील आणि शहराची शांतता कशी आबाधीत राहील हे सर्व नगरकरांचे काम आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular