अहमदनगर दि.८ जुलै
पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौका जवळ असलेल्या सिद्धेश्वर मंदिरा मध्ये मंदिराची दानपेटीचे कुलूप तोडुन त्यातील रक्कम चोरुन नेल्याचा घटना चोवीस जून रोजी घडली होती.या प्रकरणी सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी देविदास मोहोळे यांनी लोकांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना पाईपलाईन रोडवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून या सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीचा शोध घेतला.
विजय सुनिल यालल असा आरोपी सीसीटीव्ही फुटेज द्वारे पोलिसांनी निष्पन्न केल्यानंतर त्याचा तपास घेतला असता तो रामवाडी परिसरात असल्याचं तोफखाना पोलिसांना कळतात पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून विजय यालल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकांना पोलिसांनी त्याचा साथीदार रोहन अरुण साळवे याला ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून या आरोपींनी तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमधील सिद्धेश्वर मंदिर, डोकेनगर येथील साईबाबा मंदिर, सुर्या नगर येथील गणेश मंदिर, बालिकाश्रम येथील साईबाबा मंदिर, भिंगार येथील मानाचा गणपती मंदिर येथे दान पेटी फोडल्याची कबुली दिली.
ही कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदनगर शहर विभाग अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखालील तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकातील नितीन रणदिवे, पो. उपनिरी समाधान सोळंके, पो. हे कॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, पो.ना. अविनाश वाकचौरे, संभाजी बडे, संदिप धामणे, सुरज वाबळे, वसिम पठाण, अहमद इनामदार, पो.कॉ. सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, सतिष भवर, संदिप गिऱ्हे, गौतम सातपुते, सचिन जगताप, शफी सय्यद, यांनी केली आहे.