Homeक्राईमबेकायदेशीर रेशन गव्हाची तस्करी करणा-या इसमावर कोतवाली पोलीसांची कारवाई

बेकायदेशीर रेशन गव्हाची तस्करी करणा-या इसमावर कोतवाली पोलीसांची कारवाई

advertisement

अहमदनगर दि. १२ जुलै

कोतवाली पोलिसांनी शासकीय योजनेतील गहू खुल्या बाजारात विक्री साठी आणत असताना नगर दौंड रोड वर पकडला आहे.ही कामगिरी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शन गुन्हे पथकाचे पीएसआय मनोज कचरे
पोहेकी तनवीर शेख, पोहेकॉ ओटी, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना गोरख काळे, पोना रियाज इनामदार, पोना योगेश खामकर, पोना सलिम शेख, पोकों संदिप थोरात, पोकों कैलास शिरसाठ, पोकों सोमनाथ राऊत, पोकों अमोल गाडे, पोकों सुजय हिवाळे, पोकॉ सागर मिसाळ, पोक अतुल काजळे यांच्या पथकाने केली आहे.

त्यांना मिळालेल्या माहितीनुसार नगर दौंड रोड वरून एक वाहन रेशनचे गहू नगर शहरात खुल्या बाजारात विक्रीसाठी आणत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार कोतवाली पोलिसांच्या पुणे शोध पथकाने कानेटिक चौक परिसरात सापळा लावला होता त्यावेळी एक विना क्रमांकाचा टाटा कंपनीचा टेम्पो संशयास्पद आढळल्याने या टेम्पोची तपासणी केली असता या टेम्पोमध्ये शासकीय धान्य वितरण योजनेतील अन्न धान्याचे रिकामे बारदाणे गोणपाट व मागील हौद्यात पांढरे रंगाचे बारदाणा असलेले पोते त्या मध्ये रेशनचा गोणी पल्टी केलेला गहु, व काही पोत्यात मका, ज्वारी, हरबरा असे धान्य वाहनात भरलेला आढळून आला त्यातील गहु हे धान्य शासकीय स्वस्त अन्न धान्य वितरण योजनेतील असल्याची पुरवठा निरीक्षक यांची देखील खात्री झाल्याने लक्ष्मण अनिल कासार याच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये पोका सुजय हिवाळे यांच्या फिर्यादी वरुन गll अत्यावश्यक वस्तु कायदा कलम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आधीही अनेक वेळा गरिबांच्या ताटातील अन्न म्हणजेच रेशनचा गहू खुल्या बाजारात विक्री होत असताना पकडला गेला मात्र या साखळी मधील म्होरक्या कधीही सापडला गेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेवटच्या मूळ मोहरक्यापर्यंत तपास जाणे गरजेचे आहे अन्यथा गरिबांचे टातातील अन्न असेच खुल्या बाजारात विक्री होत राहील.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular